Friday, April 11, 2025
Home मराठी ‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर

‘रंग प्रेमाचा,’ म्हणत सोनाली कुलकर्णीने ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त केले खास फोटो शेअर

स्टायलिश, आयकॉनिक, बोल्ड, सुंदर अशी अनेक विशेषणं घेतली की, समोर येते ते सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे देखणे रूप. आपल्या दिलखेचक अदांनी चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी ती सोडत नाही. अशातच तिचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिने खास व्हॅलेंटाईन डे निमित्त हे फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने (sonalee kulkarni) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यावे तिने ऑफ शोल्डर फ्लोरल ब्लाऊज घातला आहे, तिने यावर सुंदर इअरिंग घातले आहेत, तसेच गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घालून हा लूक पूर्ण केला आहे. (sonalee kulkarni share her beautiful photos on social media)

“हे फोटो शेअर करून तिने ‘रंग प्रेमाचा,” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “अप्सरा स्वर्गातून आज भूतली अवतरली आहे ,जणू आज दिवसा चांद रात आहे.” तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, “जाळ आणि धूर संगटच लव्ह यु मॅम.” अशाप्रकारे तिच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत.

सोनाली कुलकर्णी ही मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मेहनती अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने तिचे नाव कमावले आहे. २०२१ मध्ये तर तिच्या ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ या चित्रपटांनी धमाल केली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ती सध्या तिच्या अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्याला सोनाली विविध नवीन भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे यात काही शंका नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा