…म्हणून सलीम खान ‘जंजीर’ चित्रपटाची कहाणी सांगण्यासाठी गेले होते थेट जया बच्चन यांच्या फ्लॅटवर

0
1013

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ 1973, साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एकच महिन्यात अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनसोबत लग्न केले होते. या चित्रपटानंतरच अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये यश प्राप्त झाले. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांचे नशीब उजवण्यासाठी लेखक सलीम-जावेद या जोडीचा मोठा हात आहे. ‘जंजीर’ या चित्रपटाची कहाणी त्यांनीच लिहिली होती. या चित्रपटा नंतर अमिताभ यांचे नशीब चमकले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्या आधी अनेक मोठ्या कलाकारांनी ‘जंजीर’ या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. त्यानंतर हा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्याकडे आला. या चित्रपटाची अभिनेत्री निवडणे देखील निर्मात्याने सोप्पी गोष्ट नव्हती. माध्यमातील वृत्तानुसार सलीम जावेद यांना त्यावेळी समजले होते की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत कोणतीही मोठी अभिनेत्री काम करणार नाही कारण त्यावेळी अमिताभ हे मोठे स्टार नव्हते. त्यावेळी या चित्रपटाची कहाणी ऐकवण्यासाठी सलीम खान जया बच्चन यांच्या घरी गेले होते.

सलीम खान यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते की, “जयाला ‘जंजीर’ या चित्रपटाची कहाणी सांगण्यासाठी मी तिच्या फ्लॅटवर गेलो होतो. मला असे वाटले होते की या चित्रपटात कोण अभिनेता आहे हे समजल्यानंतर ती या चित्रपटात काम करण्यास नकार देईल. मी जेव्हा तिला कहाणी ऐकवली तेव्हा ती म्हणाली की, माझ्या यात काय आहे?”

जयाचे उत्तर ऐकून सलीम खान म्हणाले होते की, “मला माहित आहे चित्रपटात तुला करण्यासारखे काही नाहीये.परंतु चित्रपटात अमिताभ बच्चन हिरो आहे. मला आशा आहे की, त्यांच्यासाठी तुम्ही हा चित्रपट नक्कीच कराल. हे ऐकून जया यांनी लगेच या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. (when salim khan himself went to her flat yo tell the story of zanjeer to jaya bachchan know what the actress says)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चार मुलं असताना सलीम खान यांनी केले होते हेलनसोबत लग्न, अशी होती कुटुंबीयांची प्रतिक्रिया

अभिनेता सलमान खान पास होण्यासाठी करायचा ही आयडिया, वडील सलीम खान यांनी सांगितला किस्सा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here