अभिनेत्री आणि डान्सर सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक. घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे. सोनालीच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. यानिमित्त सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने मोरपंखी रंगाची सुंदर साडी नेसलेली आहे. यावर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घातले आहे. कानात साडीला मॅचिंग ईअरिंग घातले आहेत. तसेच कपाळी टिकली लावली आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या लूकमधील तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (Sonalee kulkarni share her saree look photos on social media)
सोनालीने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. फोटोवर सोनालीची खास मैत्रीण आणि डान्सर फुलवा हिने “खूप सुंदर” अशी कमेंट केली आहे. या कमेंटला रिप्लाय देत सोनालीने “लव्ह यू” असे लिहिले आहे. यासोबत क्रांती रेडकर हिने “सो ब्युटीफूल” अशी कमेंट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “असे सौंदर्य आहे कोणीही प्रेमात पडेल.” तिचे हे फोटो अनेकांना खूप आवडले आहे.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी
-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी
-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?










