तब्बल ६१ वर्षांपूर्वी म्हणजेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात दरवर्षी १ मे ला ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, सध्याच्या कोरोना काळात, हे कार्यक्रम आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे सर्वांनी घरी राहूनच एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्त, मराठमोळ्या अभिनेत्रींनी पारंपारिक लूक करून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचे मराठी लूकमधील हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले आहेत. चला पाहूयात फोटो…
प्रिया बापट
‘टाईमपास २’ मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीचा पारंपारिक लूक बराच चर्चेत आला आहे. या खास दिनानिमित्त प्रिया बापटने भगव्या रंगाच्या नऊवारी साडीवर, जांभळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान केलेले पाहायला मिळाले. यावर तिने पारंपारिक दागिने घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
सोनाली कुलकर्णी
महाराष्ट्रदिनी मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’चा जबरदस्त अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. सोनाली कुलकर्णीने जांभळ्या रंगाच्या काठापदराची अन् हिरव्या रंगाचे ब्लाऊज घातलेले दिसले. कपाळावरच्या चंद्रकोरने तर लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.
अमृता खानविलकर
अभिनेत्री अमृता खानविलकरनेही काही खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. पारंपारिक लूकमध्ये ती बरीच सुंदर दिसत आहे. हिरव्या-निळ्या रंगाच्या साडीवर, तिचे मोकळे केस नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वैदेही परशुरामी
आपल्या सुंदरतेने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री वैदेही परशुरामी सुद्धा मराठमोळ्या लुकमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाची साडी परिधान करून, हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे जोरदार व्हायरल होत आहेत.
उर्मिला कोठारे
प्रतिभावान अभिनेत्री उर्मिला कोठारे या दिवशी रुबाबदार अंदाजात पाहायला मिळाली. तिने नऊवारी साडीवर गॉगल लावला आहे, तर डोक्यावर फेटाही बांधला आहे. अशा या लूकमध्ये अभिनेत्री बुलेटवर बसून पोज देताना दिसली.
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. तिनेही महाराष्ट्र दिनानिमित्त अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आहे.
निळ्या रंगाच्या काठापदराच्या साडीतील तिच्या अदा पाहून चाहते पुन्हा तिच्यावर फिदा झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-