डिप्रेशनचा बळी ठरलेल्या ड्वेन जॉन्सनने खाल्लीय जेलची हवा, रेसलिंगमध्ये पाऊल टाकत ‘द रॉक’ म्हणून मिळवली प्रसिद्धी


हॉलिवूडसह संपूर्ण जगात आपले नाव ड्वेन जॉन्सनने अजरामर केले आहे. ड्वेनला ‘द रॉक’ म्हणून देखील ओळखले जाते. माजी कुस्तीपटू तसेच अमिरिकन,आणि केनेडीयन फुटबॉल संघाचा माजी सदस्य म्हणूनही त्याची ओळख आहे. आपल्या तंदुरुस्तीने व अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा ड्वेन जॉन्सन रविवारी (२ मे) आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या खास प्रसंगी ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सनबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

जेव्हा ड्वेन जॉन्सन हा २० वर्षांचा होता, तेव्हा त्याला अमेरिकन फुटबॉल संघ कॅलगरी स्टॅम्पेडर्समधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तो नैराश्येचा (डिप्रेशन) बळी ठरला होता. हे उघडपणे ड्वेनने स्वत: एका कार्यक्रमात सांगितले होते. ड्वेन या मुलाखतीत म्हणाला होता की, ‘आपण एकटे आहोत, असे आपल्याला वाटत असते, आणि हे सर्व फक्त आपल्याचबरोबर घडत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आपण हे समजून घ्यावे की, आपण केवळ एकटेच नाही, ज्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडत आहे किंवा आपणच ते शेवटचे आहात.’

मुलाखतीत ड्वेनने पुढे सांगितले होते की, ‘सुमारे ६ आठवड्यांनंतर माझ्या प्रशिक्षकाने मला संघात परत यावे असे सांगितले होते, पण मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितले की, हे करून मी माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठी चूक करत आहे. पण बहुदा माझ्यासाठी ते सर्वोत्कृष्ट ठरले. कारण फुटबॉल हातून सुटल्यानंतरच, कुस्ती माझ्या आयुष्यात आली होती.’

ड्वेन बर्‍याच वेळा तुरुंगात गेला होता. याचा खुलासा त्याने स्वतः काही काळापूर्वी सोशल मीडियावर केला होता. ड्वेनने जिमी फोले यांचे ट्वीट रिट्विट करत लिहिले होते की, ‘मी पोट धरून हसत आहे. एकाला मिशी होती, ज्यांना वारंवार अटक होत होती, तर दुसऱ्याला चांगली नोकरी होती, आणि तो स्थानिक बाजारातील प्रत्येकाचा आवडता ग्रोसरी बॉय होता …खुप प्रेम मित्रा!!’

ड्वेनचे त्याच्या इंस्टाग्रामवर २३२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, ड्वेन स्वतःच इंस्टाग्रामवर ४२३ लोकांना फॉलो करतो. यासह, ड्वेन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, आणि त्याने आतापर्यंत ५७०० पेक्षा अधिक पोस्ट केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ड्वेनला जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणून फोर्ब्सच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.

ड्वेनच्या अभिनय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ‘द ममी रिटर्न्स’, ‘द स्कॉर्पियन किंग’, ‘बेवॉच’, ‘फास्ट एँड फ्युरिअस’ यासह अनेक चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ड्वेना प्रथमच मोठ्या पडद्यावर सुपरहीरो अवतारात दिसणार आहे. त्याची लोकप्रियता प्रचंड असून, तो कायमच चाहत्यांचे वेगवेगळ्या प्रकारे मनोरंजन करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का अन् विराटच्या लग्नात चिक्कार पैसा केला होता खर्च, इटलीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आले होते ‘इतके’ कोटी बिल

-पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

-जेव्हा मन्ना डे यांनी प्रेमिकेसाठी घातला होता वडिलांशी वाद; वडिलांनी ऐकलं नाही, तर आईने लाऊन दिले लग्न!


Leave A Reply

Your email address will not be published.