Tuesday, October 14, 2025
Home मराठी सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, हिरव्या रंगाच्या साडीमध्ये गजब दिसतेय अप्सरा

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, हिरव्या रंगाच्या साडीमध्ये गजब दिसतेय अप्सरा

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये सोनालीची ओळख अप्सरा अशी आहे. सोनाली सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे नवनवीन लूक ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा मॉर्डन लूक तसेच पारंपरिक लूक ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, की तिने वेव्ह पॅटर्नची हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. यासोबत तिने स्लिव्हलेस काळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे. तिने केसांची पोनीटेल घातली आहे. तर कानात मोठ्या रिंग्स घातलेल्या आहेत. तसेच तिने केलेल्या या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करून तिने “स्वदेशी” असे लिहिलेले आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (sonalee kulkarni’s photo viral on social media )

 

काही दिवसांपूर्वी सोनाली तिच्या पतीसोबत मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. तेव्हा देखील तिने तेथील त्यांचे अनेक फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ठ डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा