Wednesday, July 3, 2024

‘सोनालीची झलक सबसे अलग!’ अभिनेत्रीच्या साडीलूकने चाहत्यांना केलं डायरेक्ट ‘क्लीन बोल्ड’

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आपल्या सौंदर्याने आणि नजरेच्या एका इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. तसेच तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाइल सगळ्यांना खूप आवडते. तिचे चाहते देखील तिच्या नवनवीन ड्रेसिंग स्टाइलला प्रोत्साहन देत असतात. अशातच तिचे साडीमधील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने केशरी रंगाची काठाची साडी नेसलेली आहे. यावर तिने केशरी रंगाचे स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेले दिसत आहे. यासोबत तिने कपाळी छोटीशी टिकली लावलेली आहे. हातात बांगड्या घातलेल्या दिसत आहेत. या फोटोमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे. (Sonalee kulkarni’s saree look viral on social media)

सोनालीने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे की, “अप्सरा पुन्हा पुन्हा उतरते आणि घायाळ करते.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “सोनालीची झलक सबसे अलग.” तसेच इतर अनेक चाहते देखील या फोटोवर लक्षवेधी कमेंट करत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुराळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा