Wednesday, July 3, 2024

सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. प्रत्येक चित्रपटातील तिच्या पात्राला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. यातील एक आगळी वेगळी कहाणी घेऊन आलेला चित्रपट म्हणजे ‘शटर’ होय. या चित्रपटात अनेक कलाकारांनी एकत्र काम केले होते. सगळ्या कलाकारांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.

‘शटर’ या चित्रपटात सोनालीसोबत सचिन खेडकर, अमेय वाघ, प्रकाश बरे, राधिका हर्षे, जयवंत वाडकर आणि कमलेश सावंत यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशातच हा चित्रपट आता आपल्याला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. (Sonalee kulkarni’s shatar movie can watch on OTT platform)

सोनाली कुलकर्णीने याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. “प्रतिक्षा संपली. अनेक वर्षं तुम्ही या सिनेमाबाबत विचारत होता. आता तुम्ही प्राईम व्हिडियोवर हा सिनेमा पाहू शकता.” ‘शटर’ हा एका मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे. बंद शटर आड दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती अडकतात. त्यावेळी काय घडतं हे या सिनेमात दिसणार आहे.

सोनालीने दिलेल्या या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचा हा चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत. सोनाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती दररोज न चुकता तिच्या चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

हे देखील वाचा