मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक नवीन चित्रपटांची घोषण केली जात आहे. मुळात आजकाल अनेक वेगळ्या विषयांवर चित्रपट बनवले जात आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. त्या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. हा पोस्टर काहीतरी वेगळा आणि नाविन्यपूर्ण दिसत आहे.
सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिचा मेकअप केलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसत आहे. तसेच या पोस्टरवर ‘तमाशा लाईव्ह’ असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. तसेच पोस्टरच्या खालच्या बाजूला दिवाळी २०२२ असे लिहिले आहे. हा पोस्टर खूपच आकर्षक दिसत आहे. (sonalee kulkarni’s upcoming film tamasha live’s first poster release on social media)
हा पोस्टर शेअर करून सोनालीने लिहिले आहे की, “‘तमाशा लाईव्ह’ महाराष्ट्राचा बहुरंगी, बहुढंगी तमाशा.”
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करत आहेत. निर्माते रवी जाधव यांनी या पोस्टवर “चांगभलं” अशी कमेंट केली आहे, तर अभिनेता सुबोध भावे याने “अभिनंदन आणि शुभेच्छा,” असे लिहिले आहे. तसेच अनेकजण यावर कमेंट करून सोनालीला आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत आहेत.
‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाची निर्मिती प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्मच्या बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव हे आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली आहे, तर संजय जाधव यांनी पटकथा लिहिलेली आहे. अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे, तर अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हा एक संगीतमय चित्रपट असणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटात एकूण ३० गाणी असणार आहेत. हा असा वेगळा प्रयोग मराठीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. या चित्रपटातील गाणी क्षितिज पटवर्धन लिहित आहेत, तर अमितराज आणि पंकज पडघन हे या गाण्यांना संगीत देणार आहे. एकंदरीत हा चित्रपट भन्नाट असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पण हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना २०२२ च्या दिवाळीपर्यँत वाट पाहावी लागणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…