कलाकार म्हटले की, ओघाने फिटनेस आपोआपच येते. कलाकार आणि त्यांचा फिटनेस हा नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. कलाकार देखील अनेकदा त्यांचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करता असतात. स्क्रीनवर छान दिसण्यासाठी त्यांना त्यांच्या फिटनेसकडे लक्ष द्यावेच लागते. किंबहुना छान दिसण्यासोबतच तुमचे शरीर सुदृढ राहण्यासाठी ते फिटनेसकडे जास्त लक्ष देतात. याला मराठी कलाकार देखील अपवाद नाही.
मराठी इंडस्ट्रीमधील जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या फिटनेसबद्दल खूपच सजग झाले आहेत. फिटनेसचे नाव काढले की प्राजक्ता माळी आणि सोनाली खरे ही नावे आपसूकच ओठावर येतात. प्राजक्ता आणि सोनाली यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या दोघीही व्यायाम करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर प्राजक्ता आणि सोनाली एका जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने गुलाबी रंगाचा टि शर्ट आणि करड्या रंगाची ट्रॅक पँट घातली असून सोनालीने पिवळ्या रंगाचा टि शर्ट आणि करड्या रंगाची पँट घातली आहे. या व्हिडिओमध्ये त्या अष्टांग योगामधील एक योग करताना दिसत आहे.
नुकतीच प्राजक्ता सोनाली खरेच यूट्यूब चॅनेल असलेल्या ‘वॉव विथ सोनाली’ वरील ‘खरे बोल’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात पोहचली होती. यावेळी प्रजक्ताने तिच्या फिटनेसबद्दल तसेच तिच्या फिटनेसच्या आयुष्यातील स्थानबद्दल भरभरून गप्पा मारल्या. तिच्यासाठी फिटनेस किती आवश्यक आहे हे देखील तिने यावेळी सांगितले. याशिवाय तिच्या आयुष्याच्या चांगल्या वाईट प्रत्येक वळणावर योगाने तिला कशी साथ दिली याबद्दल देखील सांगितले. सोबतच तिला कोरोना झाल्यानंतर याच योगाने बरे होण्यास कशी मदत केली हे सुद्धा सांगितले.
प्राजक्ता किती फिटनेसप्रेमी आहे हे तर सर्वश्रुत आहेच. ती अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती करत असलेला अष्टांगयोग खूपच चर्चेत असतो. प्राजक्ता सध्या ‘महाराष्टरची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताने ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळवली आणि घराघरात पोहचली. सोनाली खरेबद्दल सांगायचे झाल्यास तिचा फिटनेस तिला किती प्रिय आहे हे सर्वांना माहीतच आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा आणि अमृता खानविलकरचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल
-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम