दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1966 साली इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. म्हणूनच हा दिवस नॅशनल बालिका दिन म्हणून साजरा होतो. हा दिवस साजरा करण्यामागे मुलींना त्यांच्या हक्कांची समाजात जाणीव करून देणे हा आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यातच हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली एक प्रतिभावान अभिनेत्रीसोबतच उत्तम लेखिका देखील आहे. तिने अतिशय उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सोनालीने बालिका दिनाचे औचित्य साधत तिच्या मुलीसोबतचे तिचे काही फोटो तर शेअर केले आहेतच सोबतच तिने मुलींसाठी एक खास कविता देखील केली आहे. सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,
“मुलगीच हवी होती मला..
एक अशी आयुष्यात दंग होणारी ठकुताई हवीच होती मला..
तिच्या पसाऱ्यात मी मला सापडते..
तिच्या पानाफुलांमधे ती हरवलेली असते..
खूप वेचत असते..
खूप शिकत असते..
खूप जास्त शहाणं करत असते आम्हाला सगळ्यांना
आम्ही खरंच भाग्यवान आहोत, आमच्या घरी ह्या कावेरी नदीचा उगम झालाय..”
सोनालीने मराठीसोबतच हिंदी आणि साऊथच्या जवळपास सर्वच भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला तिच्या अनेक चित्रपटांसाठी विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने २०१० साली बालाजी टेलिफिल्म्सचे सीईओ नचिकेत पंत-वैद्यशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी तिची मुलगी कावेरीचा जन्म झाला. सोनाली सतत कावेरी आई नचिकेतसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सतत तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वनिता खरात लवकरच अडकणार लग्न बंधनात, शेअर केले प्री- वेडिंग फाेटाेशूट
घई साहेबांनी माधुरीला नाकारत दिली होती महिमाला पसंती, ‘हा’ किस्सा ऐकून तुम्हालाही वाटेल नवल










