‘बिग बॉस मराठी‘चे तिसरे पर्व जोरदार गाजले होते. या पर्वात अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. अनेकांची मैत्री झाली, तर अनेकांची मैत्री तुटली. या शोमध्ये सोनाली पाटील आणि मीनल शाह यांच्या मैत्रीच्या चर्चा सर्वत्र चालू होत्या. त्यांना सोना-मोना अशी नावे देखील देण्यात आली. या शोमध्ये त्यांच्यातील प्रेम, रुसवे, फुगवे या सगळ्या गोष्टी सगळ्यांना खूप आवडल्या होत्या. त्यांची ही मैत्री केवळ पडद्यावर मर्यादित न राहता घराच्या बाहेर आल्यावर देखील तशीच आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर सोना-मोनाच्या जोडीने पहिल्यांदा भेट घेतली आहे. मीनल सोनालीला भेटायला तिच्या घरी गेली आहे. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीनल (meenal shah) ही सोनालीच्या (sonali patil) घरी जेव्हा तिला भेटायला गेली, तेव्हा सोनाली आणि तिच्या आईने मीनलचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले. सोनालीने तिचे औक्षण केले आणि तिला घरात घेतले. तसेच तिच्या आईने देखील मीनलचे स्वागत केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टवर मीनलने कमेंट केली आहे की, “कोणाची नजर लागू नये.” (sonali patil and meenal shah meeting at sonali’s house)
बिग बॉसच्या घरात असताना त्यांना खूप प्रेम मिळाले. विकास, विशाल, मीनल आणि सोनाली हा महाराष्ट्राचा आवडता ग्रुप होता. त्या चौघांची मैत्री सगळ्यांना खूप आवडत होती. त्यांच्या मैत्रीत अनेकवेळा वाद झाले. अनेक गैरसमज झाले. परंतु तरी देखील ते पुन्हा नव्याने एकत्र आले. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना खूप प्रेम दिले. विशाल निकमने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता होऊन ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले आहे.
हेही वाचा :