Thursday, April 18, 2024

आमिर खानच्या भाच्याला थेट रणबीर कपूरच्या गर्लफ्रेंडसोबत झाले होते प्रेम? पुढे ८ वर्षांनी…

पदार्पणातच अभिनयाचं मैदान गाजवून एका रात्रीत स्टार होणारे बॉलिवूड कलाकार तसे कमीच आहेत. त्यातच समावेश होतो तो म्हणजे अभिनेता इमरान खान याचा. खूप कमी चाहत्यांना माहिती असेल की, इमरान हा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानचा भाचा आहे. आमिरच्याच ‘कयामत से कयामत तक’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. गुरुवारी (१३ जानेवारी) इमरान आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया…

दु:खद घटनांनी भरलेलं होतं इमरान खानचं बालपण
इमरान खानची (Imran Khan) गनणा ही क्यूट आणि हँडसम अभिनेत्यांमध्ये होते. त्याचा जन्म १३ जानेवारी, १९८३ रोजी अमेरिकेत झाला होता. इमरान खानचं बालपण दु:खद घटनांनी भरलेलं होतं. जेव्हा तो अवघ्या दीड वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. आमिर खानची बहीण नुझहत खानचे पहिले लग्न अनिल पाल नावाच्या व्यक्तीसोबत झाले होते. इमरान त्यांचाच मुलगा आहे. ज्यावेळी नुझहत यांचे लग्न मोडले, तेव्हा त्यांनी अभिनेते राज जुत्शी यांच्याशी संसार थाटला. मात्र, हेही लग्न फार काळ टिकलेच नाही. इमरानवर या सर्वांचा खूप वाईट परिणाम झाला होता. मात्र, जेव्हा इमरान रुपेरी पडद्यावर आला, तेव्हा त्याने आपल्या अभिनयाने धुमाकूळ घातला होता.

एका रात्रीत झाला स्टार
त्याने २००८ साली आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत होती. या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या चित्रपटाने इमरान एका रात्रीत स्टार झाला होता. खूपच हँडसम, लाजाळू, आणि किल्लर स्माईल देणाऱ्या इमरानने जेव्हा रुपेरी पडद्यावर रोमान्स केला, तेव्हा त्याच्यावर लाखो तरुणी फिदा झाल्या होत्या. तो अनेक तरुणींच्या स्वप्नातील राजकुमार बनला होता. असे म्हटले जात होते की, त्याच्या रुपात बॉलिवूडला एक स्टार मिळाला आहे, पण कुठेतरी माशी शिंकलीच. असं काहीच झालं नाही.

बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणबीर कपूरनेही (Ranbir Kapoor) २००७ दरम्यान बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. असे म्हटले जात होते की, दोघांमध्येही चांगली टक्कर होईल. दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंध असणाऱ्या कुटुंबातून आले होते. यांच्यात टक्कर झालीच, पण ती रुपेरी पडद्यावर नाही, तर प्रेमामध्ये.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत ३ आई आणि ३ बाप

अवंतिका- रणबीरमध्ये इमरान खानची एन्ट्री
खरं तर, रणबीरची एक गर्लफ्रेंड होती. तिचं नाव होतं अवंतिका मलिक. माध्यमांतील वृत्तांनुसार, अवंतिका जेव्हा ‘जस्ट मोहब्बत’ या टीव्ही मालिकेत काम करत होती, तेव्हा रणबीर तिच्यावर इतका फिदा झाला होता की, नेहमी तो तिला भेटण्यासाठी थेट सेटवर जायचा. दोघांमध्ये चांगली मैत्रीही होती. परंतु यादरम्यान काय झालं कुणास ठाऊक अचानक अवंतिका आणि इमरानचीच लव्हस्टोरी सुरू झाली.

इमरानने अवघ्या १९ व्या वर्षापासूनच अवंतिकाला डेट करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जवळपास ८ वर्षांनी २०११ मध्ये दोघांनीही आपल्या नात्याला एक नाव दिले. ते म्हणजे पती-पत्नीचे. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, त्यांचे नाते तुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत.

इमरानचे चित्रपट
इमरान खानने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्यामध्ये ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘आई हेट लव स्टोरीज’, ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘कट्टी-बट्टी’, यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीची गाडी फार वेग धरू शकली नाही. वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार आणि फ्लॉप कारकिर्दीमुळे इमरान चित्रपटसृष्टीपासून दूर झाला.

अशा क्यूट आणि हँडसम इमरान खानला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

हेही वाचा-

हे देखील वाचा