बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील सगळेच स्पर्धक गाजले. प्रत्येकाने त्याच्या विशिष्ट अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात एक महत्वाचे स्थान निर्माण केले. अशातच घरातील स्पर्धक सोनाली पाटील ही देखील चांगलीच लोकप्रिय झाली. तिने तिच्या विनोदी स्वभावाने आणि बडबड्या वृत्तीने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले. दोन आठवड्यापूर्वी ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. तेव्हापासून ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले झाला आहे. यावेळी विशाल निकम विजेता झाला आहे.
ग्रँड फिनालेसाठी घरातून बाहेर गेलेले सर्व सदस्य उपास्थित होते. सगळ्यांनाच डान्स परफॉर्मन्स देखील झाला आहे. यावेळी सोनालीने देखील एकदम धमाकेदार डान्स केला आहे. ती या सोहळ्यासाठी पारंपारिक अंदाजात नटली होती. तिचा हा लूक लाखोंना भुरळ घालणारा होता. या लूकवर तिने या वर्षातील अत्यंत लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. (sonali patil dance video viral on social media)
सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून रक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती ‘पांडू’ चित्रपटातील ‘बुरूम बुरूम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मर्दाच गाणं हाय आणं मी या रील नाय करणार व्हय?
कोण तयार हाय माझ्या बुलेटवर बुरुम बुरुम करायले कमेंटमध्ये सांगा बिगीबिगी!” तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोनालीने ‘वैजू नंबर १’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली आणि तिने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला. तिने तब्बल ९० दिवसाचा प्रवास घरात पूर्ण केला आहे.
हेही वाचा :
विशाल निकमचे चाहते जगात भारी, कोणी डीजेवर नाचत तर कोणी फटाके फोडत केला आनंद व्यक्त
‘हे’ आहे सलमान खानचे खरे नाव; जाणून घ्या त्याच्याशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी