‘हे’ आहे सलमान खानचे खरे नाव; जाणून घ्या त्याच्याशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी


बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) सोमवारी (२७ डिसेंबर) त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस तो त्याच्या फॅन्स आणि कुटुंबासोबत साजरा करतो. चाहते त्याच्या वाढदिवसाची खूप वाट पाहत असतात. २६ डिसेंबरच्या रात्रीपासून सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज यायला सुरुवात झाली. त्याचे चाहते रात्रीपासूनच गॅलेक्सीसमोर गर्दी करू लागतात. सलमान त्याच्या अनोख्या डान्स मूव्ह्ज, ऍक्शन आणि चित्रपटांमधील अभिनयासाठी ओळखला जातो.

सध्या सलमान कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ होस्ट करत आहे. बिग बॉसच्या घरात त्याच्या ५६व्या वाढदिवसाच्या भव्य सेलिब्रेशनची तयारीही सुरू आहे. आता हे सांगू शकत नाही की, सलमान ‘बिग बॉस १५’ च्या सेटवर वाढदिवस साजरा करेल की, नाही पण प्रत्येक वेळी तो सेटवर वाढदिवस साजरा करतो.

सलमानने गेल्या वर्षी त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा केला होता. या सेलिब्रेशनमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. यावेळीही असेच काहीसे घडताना दिसत आहे.

सलमानला साप चावला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र त्याचे वडील सलीम खान यांनी ही ठोस माहिती देत, ​​सलमान आता पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत तो आपला वाढदिवस त्याच्या फार्महाऊसवरच साजरा करू शकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

अलिकडेच त्याचे दोन प्रकारचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला आहे आणि त्यानंतर त्याचा दुसरा फोटो आला आहे ज्यामध्ये तो एका व्यक्तीसोबत उभा आहे आणि त्याच्या मागे असे दिसते की, त्याचे फार्महाऊस फुग्यांनी छान सजवलेले आहे.

सलमानचा २७ डिसेंबर १९६५ रोजी इंदूरमध्ये जन्म झाला. आता तो ५६ वर्षांचा होणार आहे. त्याचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

त्याच्या वडिलांचे नाव सलीम खान आणि आईचे नाव सलमा खान आहे. त्याला अरबाज खान आणि सोहेल खान हे दोन भाऊ आहेत, तर अर्पिता खान आणि अलविरा खान या अग्निहोत्री या दोन बहिणी आहेत. सलमानचे कुटुंबीयही त्याच्या वाढदिवसाची वाट पाहत असतात आणि त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतात.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!