‘बिग बॉस मराठी’च तिसरं पर्व नुकतंच चालू झाले आहे. शोमध्ये अनेक कलाकार तसेच इतर सामान्य नागरिक देखील सामील झाले आहेत. स्पर्धकांचा खेळ तसेच अनेक टॅलेंट समोर येत आहेत. प्रेक्षक देखील या शोला जोरदार प्रतिसाद देत आहेत. या शोमध्ये अनेक कलाकार आहेत. त्यामुळे साहजिकच अभिनयात ते माहिर आहेत. अशातच बिग बॉसमधील स्पर्धकांचे एक- एक टॅलेंट समोर येत आहे. या शोमध्ये सोनाली पाटील या पहिल्या स्पर्धकाने एन्ट्री केली. घरात आल्यापासून तिच्या वागण्या-बोलण्यात कोल्हापूरचा रांगडा बाज दिसला आहे. तसेच घरात देखील ती अत्यंत सहजतेने आणि मिळून मिसळून वावरते. तिच्या कोल्हापुरी भाषेमुळे ती प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अशातच सोनालीचे अभिनयातील टॅलेंट समोर आले आहे.
बिग बॉसच्या घरात सोनाली पाटील आणि मीनल शाह या गार्डन एरियामध्ये बसलेल्या असतात. त्यावेळी सोनाली मीनलला घरातील काही सदस्यांची नक्कल करून दाखवते. ती सुरुवातीला गायत्री दातार हिचा अभिनय करून दाखवते. गायत्रीप्रमाणे ती लटकेझटके मारत बोलताना दिसते. यावर मीनल खूप हसते. नंतर मीनल उठते आणि झोपाळ्यावर येऊन बसते आणि तिला स्नेहा वाघची नक्कल करायला सांगते. यावर ती स्नेहा जेव्हा चिडली होती, तेव्हा तिने कशाप्रकारे तिचा राग व्यक्त केला होता. ही नक्कल करून दाखवली. या सगळ्या गोष्टींचा मीनल झोपाळ्यावर बसून आनंद घेत आहे. (Sonali patil show her acting talent in bigg Boss house)
सोनाली आणि मीनल या दोन्हींमध्ये पहिल्याच आठवड्यात बऱ्यापैकी मैत्री झालेली दिसत आहे. टास्क खेळताना देखील त्यांच्यामध्ये समन्वय दिसून येत आहे, पण आता या आठवड्यात त्या दोघींमध्ये वाद होतील की, त्यांची मैत्री अधिक घट्ट होईल हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहरुख खानच्या लाडक्या लेकीने शेअर केला फोटो; मिरर सेल्फीतून दाखवला तिचा कमनीय आकर्षक बांधा
-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन