Monday, July 1, 2024

सोनाली फोगाटचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, काही तासांपूर्वीच केली होती अखेरची पोस्ट

टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat)चे निधन झाले आहे. सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोनालीने अचानक जग सोडून गेल्याची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोनाली तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहायची. एवढेच नाही तर सोनालीने सोमवारी रात्री एक व्हिडिओही शेअर केला, जो सध्या व्हायरल होत आहे.

सोनाली फोगट सोशल मीडियावर खूप सक्रिय होती, म्हणूनच तिचे इंस्टाग्रामवर 880k फॉलोअर्स आहेत. सोनालीने मृत्यूच्या काही तास आधी सोमवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सोनालीने डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली आहे आणि त्यामध्ये ती आपला चेहरा लपवून उभी दिसत आहे. व्हिडिओमध्ये सोनाली फोगट स्टाईलमध्ये चालताना चेहऱ्यावरील कापड काढून कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सोनालीने पांढरा शर्ट आणि पँट घातलेली दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये काही महिला बॅकग्राऊंडमध्ये बसलेल्या दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनाली खूप आनंदी दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना विश्वास बसणे आणखी कठीण होत आहे की, आता या व्हिडिओच्या काही तासांनंतर सोनाली आपल्यात नाही. सोनाली फोगटचा हा व्हिडिओ पाहून लोक कमेंट्सद्वारे तिला श्रद्धांजली वाहत आहेत.

 

दरम्यान सोनाली फोगट सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 14 चा भाग होती. याशिवाय सोनालीने हिसार जिल्ह्यातील आदमपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर 2019 ची विधानसभा निवडणूकही लढवली होती, ज्यामध्ये तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तिच्या मृत्यूला त्याचा भाऊ वतन ढाका यांनी दुजोरा दिला. मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीय गोव्याला रवाना झाले.

हेही वाचा –
आलिया भट्ट लग्नाआधी रणबीर कपूरसोबत एकाच खोलीत का राहू लागली, ‘हे’ कारण आले समोर
चलो इश्क लडाये! खासदार नवनीत राणा आणि अभिनेता गोविंदाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
बिग ब्रेकिंग l प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाटचे दुखःद निधन

हे देखील वाचा