राज्यभरात नुकताच दहीहंडीचा जोरदार जल्लोश पाहायला मिळाला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी दहिहंडी साजरी झाल्याने सर्वत्र जोरदार जल्लोश आणि उत्साह होता. राज्यभरात अनेक राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या दहिहंडीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. सध्या सोशल मीडियावर खासदार नवनीत राणा आणि अभिनेता गोविंदाचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे विरोधकांनी नवनीत राणांवर टिका केली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा गोविंदा त्याच्या खास डान्स शैलीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे चलो इश्क लढाये गाणे तुफान हिट झाले होते. सध्या सोशल मीडियावर गोविंदाचा याच गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खासदार नवनीत राणा यांच्यासोबत दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी सोहळ्यातील आहे, ज्याला अभिनेता गोविंदाने उपस्थिती लावली होती. व्हिडिओमध्ये नवनीत राणा गोविंदासोबत चलो इश्क लढाए गाण्यावर थिकरताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियावरुन अनेकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ता नसताना, हनुमान चालिसा सत्ता मिळाल्यावर चलो इश्क लडाये असे म्हणत नवनीत राणांच्या या व्हिडिओवर नाराजी दर्शवली आहे.
सत्तेत नसताना …. हनुमान चालिसा
सत्ता मिळल्यावर …..चलो इश्क लडाये … pic.twitter.com/9k9RR3Xm77— Aditya Thackeray fans🚩🚩🚩 (@FaktAdityasaheb) August 23, 2022
दरम्यान, गोविंदा प्रमाणेच इतर बॉलिवूड कलाकारांनीही दहिहंडीच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंचावर केलेल्या मराठीमधील भाषणाचीही चर्चा रंगली होती.
हेही वाचा –
कसला तो नाद! सलमानचा टॉवेल ते करिनाचा लेहंगा, आवडत्या कलाकाराच्या वस्तू घेण्यासाठी चाहत्यांनी ओतला पैसा
बिग ब्रेकिंग l प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाटचे दुखःद निधन
दिलीप कुमार गेल्यानंतर सायरा बानो एकांतात! ना भेटतायेत, ना उचलतायेत कोणाचा फोन