काही दिवसांपूर्वी बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली फोगट (sonali fogat) हिचे निधन झाले. यावर तिला हार्ट अटॅक आल्याचे सांगितले जात होते. अशातच सोनाली फोगटचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोनालीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सोनालीच्या अंगावर धारदार वस्तूने बळजबरीने वार केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणी ४२ वर्षीय सोनाली फोगटचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर वासी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २३ ऑगस्ट रोजी सोनाली फोगटबद्दल गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, भाजप नेत्याच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात खुनाचा अंदाज होता.
सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी अंजुना पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाची तक्रार दाखल केली होती. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या समितीने गुरुवारी सकाळी सोनालीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
२२ ऑगस्ट रोजी एका मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी सोनाली गोव्यात पोहोचली होती, जिथे ती अंजुना परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबली होती. २२ ऑगस्टच्या रात्री ती एका पार्टीला गेली होती. मात्र, २३ ऑगस्टला सकाळी त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला.
View this post on Instagram
सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने तिच्या बहिणीचा पीए सुधीर सांगवान यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सोनालीच्या भावाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते, “पीए माझ्या बहिणीला ब्लॅकमेल करायचा. तो तिच्यावर वर्षानुवर्षे बलात्कार करत होता. व्हिडिओ बनवून तो माझ्या बहिणीला ब्लॅकमेल करत होता. असे सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
थिएटरमध्ये झाली अनुपम खेर आणि किरण खेरची मैत्री, पुढे आयुष्यभरासाठी बांधली रेशीमगाठ
‘काश्मिर फाईल्सपेक्षा लालसिंग चड्ढा सुपरहिट’, जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य, ट्रोलिंगनंतर ट्विट डिलीट करण्याची नामुष्की
प्रोटीन शेकसाठी दिशा पटानी डायरेक्ट जीम कोचलाच भिडली, व्हिडिओने वेधले लक्ष