Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड BIRTDAY SPECIAL | लग्नाच्या 4 वर्षानंतर सोनम कपूरने अनुभवाला मातृत्वाचा आनंद, जाणून घेऊ तिचा फिल्मी प्रवास

BIRTDAY SPECIAL | लग्नाच्या 4 वर्षानंतर सोनम कपूरने अनुभवाला मातृत्वाचा आनंद, जाणून घेऊ तिचा फिल्मी प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा (sonam kapoor) शुक्रवारी (9 जून)ला वाढदिवस आहे. अशात सोनम कपूर आज 38वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनम कपूरचा जन्म 1985 साली झाला. सोनम कपूर ही बॉलिवूडची झक्कास अभिनेत्री अनिल कपूरची (anil kapoor) मुलगी आहे. या सगळ्यात अभिनेत्री सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

साेनम कपूर तिच्या फॅशन स्टाइल आणि निर्दोष शैलीसाठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. सोनमचे नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. मात्र, सोनमचे फिल्मी करिअर काही खास राहिलेले नाही. सोनम कपूर तिच्या फिटनेस, फॅशन आणि स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

सोनम कपूरने 8 एप्रिल 2018 रोजी बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. सोनम आणि आनंदचे लग्न बी टाऊनच्या लग्झरी लग्नांपैकी एक होते. सोनम कपूरच्या लग्नाला आता 4 वर्षे पूर्ण झाली असून लग्नाच्या 4 वर्षानंतर आता ही अभिनेत्री मातृत्वाचा आनंद घेत आहे.

अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले, तर सोनम कपूरने ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यातील काही फ्लॉप तर काही हिट ठरले. नीरजा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. (sonam kapoor birthday special filmy career pregnancy s love life unknown facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘चांदीची पालखी चमकायला लागलीय’, अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
HAPPY BIRTHDAY | जेव्हा अमिषा पटेलने वडिलांवर केला होता फसवणुकीचा आरोप, ऐकून हैराण झालं होतं बॉलिवूड

हे देखील वाचा