×

सोनम कपूरने ‘या’ प्रसिद्ध डिजायनरचे ड्रेस घालून फ्लॉन्ट केले बेबी बंप, व्हिडिओ झाला व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या प्रेग्नेंसीचा आनंद लुटताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आई होणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून सोनमचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले. ज्यावर तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा सोनमचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोनम प्रसिद्ध डिजायनर मसाबा गुप्ताच्या डिझाइन केलेल्या कपड्यांमध्ये दिसत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. हा फेज ती खूप एन्जॉय करत आहे. तिने तिच्या बेबी बंपला सतत फ्लॉन्ट करत अनेक फोटोशूट देखील केले आहेत. दरम्यान, सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम कपूर प्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ताच्या डिझायनर कपड्यांमध्ये दिसत आहे. या कपड्यांसाठी सोनम कपूरने मसाबा गुप्ताचे आभार मानले आहेत.

व्हिडिओमध्ये सोनम कपूर केशरी रंगाच्या पोशाखात तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने स्वतः आरशासमोर उभे राहून व्हिडिओ शूट केला आहे. सोनम कपूर अनेकदा बेबी बंप असलेले असे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यापूर्वी तिने स्वत: मसाबा गुप्ताला विचारले होते की “ती तिच्यासाठी कपडे कधी डिझाइन करणार आहे आणि आता मसाबा गुप्ताने तिच्यासाठी खास कपडे डिझाइन केले आहेत.”

दरम्यान सोनम कपूरने इंस्टाग्रामवर ‘यामुळे माझा प्रेग्नेंसी आउटफिट अजून बनलेला नाही. आता मी थांबू शकत नाही.. मी प्रसिद्धीसाठी उत्सुक आहे. मसाबा माझे कपडे कुठे आहेत?” असा प्रश्न मसाबाला विचारला होता. यावर मसाबा गुप्तानेही उत्तर दिले होते. सोनम कपूर आणि मसाबा गुप्ता यांचे हे इंस्टाग्राम युद्ध लोकांना चांगलेच आवडले होते. सोनम आणि उद्योजक आनंद आहुजासोबत 2018 मध्ये लग्न केले होते. सोनमने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post