‘फॅशन दीवा’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनम कपूर, नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईलसाठी चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि बर्याचदा पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. २०१८ साली ती व्यावसायिक आनंद आहूजासोबत लग्नबंधनात अडकली होती. सोनम आणि आनंदच्या लग्नाला ८ मे, २०२१ रोजी ३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
आता लग्नाच्या वाढदिवसाच्या एकूण २० दिवसानंतर, आनंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी सोनमसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत आनंदने सांगितले की, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तो फोटो पोस्ट करू शकला नाही, म्हणून आता करत आहे. विशेष म्हणजे सोनमनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
आनंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक-दोन नव्हे, तर तीन फोटो शेअर केले आहेत. तिन्ही फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहेत. त्याचवेळी सोनमच्या मजेदार कमेंटमुळे ही पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. तिने या पोस्टवर कमेंट करत लिहिले आहे, “लव्ह यू…लव्ह यू…आता झोपायला या.” आनंदची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे आणि त्यापेक्षा सोनमची ही कमेंट नेटकऱ्यांचे अधिक लक्ष वेधून घेत आहे.
सोनम आणि आनंद यांच्यातील हे संभाषण काहींना क्यूट वाटत आहे, तर काहीजण दोघांची टिंगलही करत आहेत. काही युर्जसचे म्हणणे आहे की, हा फक्त एक दिखावा आहे, तर काहींनी त्यांना कुटुंब वाढवण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच एका युजरने असेही लिहिले आहे की, “असे वाटत आहे की, सोनम लवकरच ‘गुड न्यूज’ देणार आहे.”
सोनमच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘द जोया फॅक्टर’ चित्रपटात दिसली होती. तिने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात ‘सांवरिया’ने केली होती. रणबीर कपूरनेही याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर सोनमने ‘दिल्ली-६’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘रांझणा’ या चित्रपटांमध्ये काम केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…