नुकतीच २०२१ ची दमदार सुरवात सगळयांनाच केली. २०२० ला मागे टाकत, संपूर्ण जगाने २०२१ चे दणक्यात आणि सकारात्मकतेने स्वागत केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी त्यांच्या फॅन्सला आणि लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्वांमधे सोनम कपूरने दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोनम कापूरनेही तिच्या अनोख्या अंदाजात सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि तिच्या पतीचा आनंद आहुजाचा किस करतानाच एक फोटो शेयर करत सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हा फोटो शेयर करत तिने लिहले आहे कि, ” २०२१ या वर्षात मी माझ्या आयुष्यासोबत माझ्या प्रेमाला घेऊन प्रवेश करण्यास सज्ज आहे. हे नवीन वर्ष प्रेम, कुटुंब, मित्र, काम, प्रवास, आध्यत्मिक विकास या सर्वांनी भरलेले असणार आहे. मी एका चांगल्या वर्षाला बघत आहे. आम्ही खूप मेहनत घेऊ. आयुष्याला भरभरून जगू आणि मागे वळून बिलकुल बघणार नाही.”
सोनम सध्या लंडनमध्ये असून, तिने तिथेच नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. २०२० मध्ये सोनमने तीचा वेळ बऱ्यापैकी मुंबई आणि दिल्ली मध्ये घालवला. त्यानंतर ती पुन्हा लंडनमध्ये गेली. मार्च मध्ये लॉकडाऊन सुरु होण्याआधी ती पुन्हा भारतात परतली. लॉकडाउनच्या काळात आपल्या आई वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी भारतात आल्याचे तिने सांगितले.
सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या आई वडिलांचे वय जवळपास ६३ वर्ष आहे. त्यांच्यासोबत या कठीण काळात राहण्यासाठी मी पुन्हा भारतात परतली. सोबतच आनंदच्या आजी ज्या ८० वर्षाच्या आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला घरचे कोणीच नव्हते म्हणून आम्ही पुन्हा भारतात आलो.
सध्या सोनम तीच जास्तीत जास्त वेळ परिवारासाठी देत आहे. लंडन आणि मुंबई, दिल्ली यातच ती तिचे सर्व सेलिब्रेशन करत आहे. सोनमच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर सोनम लवकरच शोमे मखीजा यांच्या ब्लाइंड सिनेमात दिसणार आहे.