Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड रद्द करण्यात आला सोनम कपूरचा ‘बेबी शॉवर’, ‘या’ कारणामुळे घेण्यात आला मोठा निर्णय

रद्द करण्यात आला सोनम कपूरचा ‘बेबी शॉवर’, ‘या’ कारणामुळे घेण्यात आला मोठा निर्णय

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा टप्पा एन्जॉय करत आहे. ती आई होणार असल्याची माहिती तिने शेअर केल्यापासून, चाहतेही तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच लंडनमध्ये सोनमने तिच्या मैत्रिणींसाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु यानंतर पुन्हा एकदा सोनम कपूरचा बेबी शॉवर तिची मावशी कविता सिंगच्या येथे होणार होाता आणि त्याची तयारी जोरात सुरू होती. १७ जुलै म्हणजेच आज तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम होता, पण तो रद्द करण्यात आला आहे.

का रद्द झालं सोनमचं डोहाळेजेवण?
अभिनेत्री सोनम कपूरच्या या बेबी शॉवरला अनेक बॉलिवूड स्टार्सही हजेरी लावणार होते. सोनम कपूरचा हा कार्यक्रम तिचे वडील अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) होस्ट करणार होते. म्हणजेच, कपूर कुटुंबात बरीच धामधूम होणार होती. परंतु अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत बेबी शॉवरचे फंक्शन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता पार्टी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (sonam kapoors baby shower has canceled due to this reason)

मार्च महिन्यात दिली होती गुड न्यूज
सोनम कपूरने मार्च महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून पती आनंद आहुजासोबत तिच्या गरोदरपणाची गोड बातमी दिली होती, तेव्हापासून अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि प्रेग्नेंसीदरम्यानचे तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. सोनम कपूर बॉलिवूडमध्ये तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा