टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध कार्यक्रम ‘देवों के देव महादेव‘ मालिकेतून घराघरात पोहोचणारी ‘पार्वती’ फेम सोनारिका भदौरिया हिने आपल्या दमदार अभिनटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मात्र, अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. सोनारिका अभिनयापासून लांब असली तरी ती सोशल मीडियवर खूप सक्रिय असते. नेहमी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत प्रेक्षकांशी जोडलेली असते. तिने नुकतंच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोनारिका लकरच लग्नबंधनात अडकणार आहे, तिने चाहत्यांना काही फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहेत.
सतत आपल्या बोल्ड फोटोंनी प्रेक्षकांचे लक्ष वेधनारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनारिका भदौरीया (Sonarika Bhadoria) सध्या तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आली आहे. तिने नुकतंच तिचा बॉयफ्रेंड विकास पराशर (Vikas Parashar) याच्यासोबत गुपचुप साखरपुडा उरकला आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा गोवामध्ये थाटामाटात पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सोनारिक हिने आपल्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने तिचा होणार पती म्हणजेच विकाससाठी एक नोटही लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, “2.12.2022 रोजी माझ्या पुर्ण हृदयासाठी आणि पुर्ण आयुष्यासाठी…मी स्वत: माझ्या आयुष्याला एक सुंदर भेट दिली आहे. या आशिर्वादासाठी मी खूप खुश आहे. साखरुड्याच्या खुप खुप शुभेच्छा विकास.” शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुदर आणि खुश दिसून येत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्रीने परिधान केलेल्या फिकट जांभळ्या रंगाच्या घागऱ्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्यासोबतच विकासनेही मॅचिंग रंगाचा सुटबुट परिधान केलेला दिसून येत आहे. सोनारिकाचा होणार पती मोठा उद्योगपती आहे. हे दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी दोघांनीही आपल्या नात्याला नवा दिले. सोशल मीडियावर यांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत असून चाहत्यांनी देखिल अभिनेत्रीच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा 2’वर काम सुरू करण्यापूर्वी रिषभ शेट्टीने घेतले ‘या’ देवाचे दर्शन, परवानगीही मिळाली
श्रद्धा कपूर आणि रणबीर यांची कॉमेडी लव्हस्टोरी लवकरच रुपेरी पडद्यावर, टीझर पाहिलात का?