Thursday, November 14, 2024
Home अन्य श्रद्धा कपूर आणि रणबीर यांची कॉमेडी लव्हस्टोरी लवकरच रुपेरी पडद्यावर, टीझर पाहिलात का?

श्रद्धा कपूर आणि रणबीर यांची कॉमेडी लव्हस्टोरी लवकरच रुपेरी पडद्यावर, टीझर पाहिलात का?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर मोठ्या ब्रेकनंतर ‘ठुमकेश्वरी‘ गाण्यामध्ये पाहुणी कलाकर म्हणून पाहायला मिळाली. या गाण्यामुळे चाहते खूप आतुरतेने श्रद्धाच्या नवीन चित्रपाटाची वाट पाहात होते. मात्र, अभिनेत्रीने चाहत्यांची चाहत्यांच्या उत्सुकतेला तडा दिला आहे. म्हणजेच अभिनेत्री लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. श्रद्धासोबत मुख्य भूमिकेत रणबीर कपूर पाहायाल मिळणार असून बुधवाद (दि, 14 डिसेंबर) रोजी चित्रपटाची घोषणा केली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता लव रंजन (Love Ranjan) यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना आगामी येणाऱ्या चित्रपटाचा इशारा दिला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर ‘टीजेएमएम’ असे लिहिलेले होते, ज्याचा चाहते वेगवेगळा अर्थ काढत होते. त्याशिवय अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने देखिल चित्रपटाचं मजेदार नाव सुचवलं होतं. त्यामुळे निर्मात्यानेच चित्रपटाचे नाव सांगितले ‘तू झूठी मैं मक्कार है’ ( Tu Zhuti Main Makkar Hai)

‘तू झूठी मैं मक्कार है’ या चित्रपटाचा टीझरही आजच प्रदर्शित करण्यात आला आहे ज्यामध्ये श्रद्धा आणि रणबीरची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. टीझर पाहून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. नावाप्रमाणेच चित्रट एक रोमांटिक कॉमेडीने भरलेला आहे. लव रंजन यांनी बॉलिवूडमधील ‘प्यार का पंचनामा‘, ‘सोनू के टीटू की स्वीटी सारख्या धमाकेदार चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यामुळे चाहत्यांना ‘तू झूठी मैं मक्कार है’ या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

‘तू झूठी मैं मक्कार है’ या चित्रपाटाचा टीझर (दि, 16 डिसेंबर) पासून सिनेमागृह आणि सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझरही दाखवला जाइल. चित्रपाटाचा टाइटल अनाउसमेंट व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि रणबीरची एक झलकीही पाहायला मिळणार आहे. या चित्रपाटमध्ये श्रद्धा आणि रणबीर शिवाय डिंपल कपाड़िया (Dimple Kapadiya) आणि बोनी कपूर (Boni Kapoor) हे रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘तू झूठी मैं मक्कार है’ हा चित्रपट 2023 मध्ये चित्रपटागृहामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
आईची कुशी असेल, तर उशीची काय गरज! हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच प्रसिद्ध गायकाने आईसोबतचा फोटो केला शेअर
‘लोक आपला वेळ विसरतात…’, म्हणत यशपाल यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीवर व्यक्त केला संताप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा