राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी ही घोषणा केली. रोख पाच लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) देण्यात येतो. सुरेश वाडकर हे मराठी, हिंदी आणि इतर भाषांतील गाण्यांमधून आपल्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजाने रसिकांची मनं जिंकून घेत आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिका आणि कार्यक्रमांमध्ये गायले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
याशिवाय, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2023साठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळय़े यांची निवड करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण करणाऱ्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2023 साठी पं. मकरंद कुंडले यांची निवड करण्यात आली आहे. संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये दोन वर्षांचे अनुक्रमे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या पुरस्कारांची रक्कम पाच लाख रुपये होती. ती आता दहा लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
विभागीय पुरस्कार
नाटक : वंदना गुप्ते, ज्योती सुभाष
उपशास्त्रीय संगीत : मोरेश्वर निस्ताने, ऋषिकेश बोडस
कंठ संगीत : अपर्णा मयेकर, रघुनंदन पणशीकर
लोककला : हिरालाल सहारे, कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज
शाहिरी : जयंत अभंगा रणदिवे आणि राजू राऊत
नृत्य : लता सुरेंद्र, सदानंद राणे
चित्रपट : चेतन दळवी, निशिगंधा वाड
कीर्तन प्रबोधन : संत साहित्यिक प्राची गडकरी, अमृत महाराज जोशी
वाद्य संगीत : पं. अनंत केमकर, शशिकांत सुरेश भोसले
कलादान : संगीता राजेंद्र टेकाडे आणि यशवंत रघुनाथ तेंडोलकर
तमाशा : बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर), उमा खुडे
आदिवासी गिरीजन : भिकल्या धाकल्या धिंडा, सुरेश नाना रणसिंग
या पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. (Song Empress Lata Mangeshkar Award announced to veteran singer Suresh Wadkar)
आधिक वाचा-
–बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटात दाखवले सर्वात लांब किसिंग सीन, पाहा यादी
–करीनाने काढलेल्या रांगोळीची जेहने अशी लावली वाट, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली….