Wednesday, June 26, 2024

‘भांडणासाठी मुद्दे वाढवण्यापेक्षा जुने मुद्दे सोडवा’, म्हणत सोनू निगमने मांडले राष्ट्रभाषा वादावर मत

मागील काही दिवसांपासून मनोरंजनविश्वात हिंदी भाषेला घेऊन वाद सुरु झाला आहे. कन्नड स्टार असलेल्या किच्चा सुदीपच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यांनंतर अजयने त्याला ट्विटरवरून दिलेले उत्तर आणि वाढत जाणारा हा वाद हे सर्वांनाच माहित आहे. यानंतर या मुद्द्यावर साऊथ, हिंदी सर्वच कलाकार त्यांचे मत मांडताना दिसत आहे. आता या यादीमध्ये गायक सोनू निगमच्या नाव देखील जोडले गेले आहे. सोनू नेहमीच त्याचे मत निर्भीड आणि परखडपणे मांडताना दिसतो.

नुकताच एका कार्यक्रमाला पोहचलेल्या सोनूला या भाषा वादावर एक प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असे कुठे लिहिले नसल्याचे सांगितले. तो म्हणाला की, “आपल्या देशाच्या संविधानात कुठेही हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असा उल्लेख केला गेलेला नाही. संपूर्ण भारतात हिंदी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असू शकते, मात्र आपली राष्ट्रभाषा नाही.”

पुढे सोनू म्हणाला, “तामिळ सर्वात जास्त जुनी भाषा आहे. अनेकदा लोकांमध्ये यावरूनही वाद होतो की, सर्वात जुनी भाषा तामिळ आहे की संस्कृत? मात्र सर्वात जुनी भाषा तामिळ आहे. देशात वादाचा नवीन मुद्दा निर्माण करण्यापेक्षा जुनेच मुद्दे सोडवले पाहिजे. ज्याला जी भाषा आवडते त्याला ती बोलू द्या. देशातील लोकांना आता भाषेवरून नका वाटू आधीच खूपच भांडणं होत आहे.”

तत्पूर्वी अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यामध्ये भाषेला घेऊन वाद सुरु झाला होता. किच्चा सुदीपने हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचे सांगितले त्यानंतर अजय देवगणने किच्चा सुदीपच्या या विधानावर ट्विटरवरून उत्तर देताना त्याला विचारले की, ‘राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमचे सिनेमे हिंदीमध्ये डब का करतात?’ त्यानंतर किच्चा सुदीपने सांगितले की शब्दांना चुकीचे समजले जात आहे. त्यानंतर हा वाद वाढत गेला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा