Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सायकलने जाणार की रिक्षाने’, मालदीवला पाठव म्हणणाऱ्या युझरला सोनू सूदचे मजेशीर प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला होता. त्याने परराज्यातील हजारो कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. लॉकडाऊन संपले असले तरी सोनू लोकांची मदत करताना दिसत आहे. तो ट्विटरवर सक्रिय असतो आणि चाहत्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तरही देतो. मालदीवला पोहोचवा म्हणणाऱ्या एका युझरला त्याने मजेशीर प्रत्युत्तर दिले आहे.

खरं तर एका युझरने सोनूला टॅग करत लिहिले होते की, “सर, मला मालदीवला जायचे आहे. मला तिकडे पाठवा.” यावर प्रत्युत्तर देत सोनूने लिहिले की, “भाई, सायकलने जाणार की रिक्षाने?” सोनूच्या या ट्वीटवर अनेक युझर्सने मजेशीर कमेंट केल्या.

एका युझरने लिहिले की, “भाई तू माझ्याकडे ये. माझ्याकडे अलादिनची चटई आहे. तुला मालदीवच नाही तर मंगळ ग्रहावर पोहोचवतो.”

मागील काही दिवसांत काही युझर्सने सोनू सूदच्या एका ट्वीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. खरं तर ट्विटरवर एका व्यक्तीने आपल्या मुलाच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मागितली होती. ट्रोल करणाऱ्या युझर्सचे म्हणणे होते की, त्या व्यक्तीने सोनू सूदला टॅगही केले नाही. मग त्याला कसे समजले?

लॉकडाऊनमध्ये सोनूने आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली. त्यामुळे गरजू व्यक्ती सोनूकडे मदतीसाठी धाव घेताना दिसत आहेत.

वाचा-

-धक्कादायक! तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी; तक्रार केली दाखल

-‘तुम्हाला स्वत:ला लाज वाटली पाहिजे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर कंगनाची आगपाखड

हे देखील वाचा