बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा मागील एक वर्षापासून कोरोना रुग्णांना मदत करत आहे. मागील वर्षी त्याने अनेक प्रवासी मजुरांना मदत केली होती. यावर्षी देखील तो अनेक कोरोना रुग्णांना मदत करत आहे. त्याने त्याच्या नावाचे एक फाऊंडेशन देखील सुरू केले आहे. यासाठी अनेकजण त्याला मदत करतात. अशातच त्याच्या या फाउंडेशनला एका खास व्यक्तीने मदत केली आहे. या गोष्टीची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे.
सोनू सूदच्या या फाउंडेशनला मदत केलेल्या या व्यक्तीची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने ट्वीट करून त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. सोनू सूदने एका दिव्यांग मुलीचा फोटो शेअर करून सांगितले आहे की, तिने फाऊंडेशनला 15000 रुपये डोनेट केले आहे. सोनूने सांगितले की, त्याच्यासाठी ही महिला जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे.
Boddu Naga Lakshmi
A Blind girl and a youtuber.
From a small village Varikuntapadu in andra Pradesh
Donated 15000 Rs to @SoodFoundation & that's her pension for 5 months.
For me she's the RICHEST Indian.
You don't need eyesight to see someone's pain.
A True Hero???????? pic.twitter.com/hJwxboBec6— sonu sood (@SonuSood) May 13, 2021
सोनू सूदने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “बोड्डू नागा लक्ष्मी हे या महिलेचे नाव आहे. ती एक दिव्यांग आणि यूट्यूबर आहे. ती आंध्र प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहते. तिने सूद फाऊंडेशनसाठी 15000 रुपये डोनेट केले आहे. हे पैसे तिच्या पाच महिन्याची पेन्शन आहे. माझ्या मते ती सर्वात श्रीमंत महिला आहे. तुम्हाला कोणाचे दुःख बघण्यासाठी डोळे असण्याची गरज नाहीये. एक खरा हीरो.”
सोनू सूदने सामान्य जनतेसोबत अनेक कलाकारांना देखील मदत केली आहे. त्याने नुकतेच क्रिकेटपटू हरभजन सिंगला मदत केली आहे. हरभजनने ट्विटरवर रेमेडेसिविर इंजेक्शनची मदतीची मागणी केली होती. त्यावर सोनू सूदने त्याला मदत लवकरच पोहचेल असे सांगितले होते. त्याने केवळ 10 मिनिटात मदत केली होती. त्याने सुरेश रैनाला देखील मदत केली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे आवश्यक’, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका










