माणूस दिलदार आहे! एकाच कुटूंबातील चार मुलींना ‘या’ कारणांमुळे सोनू सुदने घेतले दत्तक


बॉलिवूडमधीलच नाही तर रियल लाइफ हिरो म्हणजे अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य लोकांसाठी देवदूतच बनला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जेव्हा देशात जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला होता, त्याचवेळी याने विविध भागात अडकलेल्या मजुरांसाठी सढळ हस्ते मदत केली होती. लहान मुलांना स्कॉलरशिप देण्यापासून ते गरिबांना जेवण देण्यापर्यंत सर्वच गोष्टींत मदत करण्यासाठी त्याने कधीच हयगय केली नाही. आजही त्याच्या मार्फत अनेक मदतकार्य चालूच असतात.

कोरोनाच्या काळात मदत करणारा हा अभिनेता आता आणखी एक मदतीचे पाऊल पुढे टाकणार आहे. उत्तराखंड येथील चामोली येथे जी दुर्घटना झाली होती, तेव्हा अनेक लोकांना मृत्युचा झाला. अशाच मृत्यू झालेल्या कुटुंबातील लोकांचा आधार होण्याचं काम तो करणार आहे.

चामोली दुर्घटनेमुळे सोनुने टिहरी गावातील दोगी पट्टीच्या एका पीडित कुटुंबातील चार मुलींना दत्तक घेतले आहे. या गावातील आलम सिंह हे जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित कंपनीमध्ये जो अपघात झाला होता तेथील कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. ज्या दिवशी पूर आला तेव्हा ते बोगद्यात काम करायला गेले होते आणि तेव्हाच पूर आला व काही दिवसांनी त्यांचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला होता. या घटनेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब हे असहाय्य आणि निराधार झाले होते. त्यांना चार मुली आहेत, ज्या वडिलांच्या मृत्युमुळे पूर्णपणे तुटल्या होत्या. मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्या पत्नीवर आली होती. त्यामुळे त्या चार मुलींना दत्तक घेण्याचे सोनू सूद याने ठरवले. आणि त्यांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सगळा खर्च तो करणार असल्याचे देखील त्याने आश्वासन दिले.

सोनू सूद याने इतरांना देखील मदत करण्याचे आश्वासन केले आहे. जेणेकरून ज्या लोकांचे या दुर्घटनेतमुळे प्राण गेले आहेत किंवा बेताची परिस्थिती निर्माण झाली आहे,  त्यांना एक प्रकारे मदत होईल व ही सर्व स्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल. दरम्यान काही सामाजिक संस्थांनी देखील ही परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.

इतक्या मोठी मदत करण्याची सोनू सूद याची ही पहिली वेळ नाही आहे. याअगोदर सुद्धा बिहार आणि आसाममध्ये पुर आला होता तेव्हा सुद्धा त्याने अनेकांना मदत केली होती. सोबतच त्याने अनेक राज्यात गरीबांना नोकरी मिळावी, यासाठी देखील मोहीम राबवली होती.

सोनूने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषिक चित्रपटात काम केले आहे. भगतसिंग हा त्याच्या कारकिर्दीतील पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर तो दबंग या चित्रपटात देखील दिसला. सोबतच आशिक बनाया आपने, अरुंधती, जोधा अकबर, युवा, हॅपी न्यू इयर आणि सिंबा या चित्रपटात देखील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.