Sunday, July 21, 2024

कराटे चॅम्पियनने सोनू सूदला समर्पित केले तिचे गोल्ड मेडल, अभिनेत्याने एकदा केली होती ‘ही’ मदत

सर्वसामान्य आणि गरीब लोकांचा मसिहा सोनू सूद (Sonu Sood) खरा हिरो असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अलीकडेच एका कराटे चॅम्पियनने आपले सुवर्णपदक अभिनेत्याला समर्पित केले आहे. कराटे चॅम्पियन अमृत मनपोत्रा ​​हिने २०१९ साली दक्षिण आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने अलीकडेच सोनू सूदचे संरक्षक म्हणून वर्णन करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोनूला भेटतानाचा फोटो शेअर करत अमृतने सांगितले की, सोनूने तिला २ वर्षांपूर्वी मदत केली होती. अमृतला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली होती. कोविड-१९ लॉकडाऊनपासून सोनू देशभरात अनेकांना मदत करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने अमृतलाही मदत केली होती, त्यानंतर ती देशासाठी स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.

अमृतने सोनूसोबत सर्जरीच्या आधीचे आणि नंतरचे फोटो शेअर केले आहेत. तिने लिहिले, “दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला शस्त्रक्रियेची नितांत गरज होती, तेव्हा सोनू देवदूतासारखा आला आणि मला मदत केली.” अमृतच्या पोस्टनंतर सोनूने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर तिच्यासाठी एक लव्ह नोटही शेअर केली आहे. (sonu sood helped karate champion)

सोनूने लिहिले, “जेव्हा तुम्ही इतरांच्या जीवनात झालेला प्रभाव पाहता, तेव्हा तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनते. २ वर्षांपूर्वी अमृतला भेटलो, जेव्हा त्याला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची नितांत गरज होती. तिची स्वप्ने मोठी होती, पण गोष्टी वाईट होत्या. तिला मदत करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. आज तिच्या हातातील हे पदक पाहून मला यश मिळाल्याचे वाटते.”

सोनूने असेही सांगितले की, ती अमृत बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. सोनूने लिहिले, “मला खात्री आहे की ती आपल्या सर्वांना आणि देशाला अभिमानीत करेल.” सोनूच्या इंस्टाग्राम पोस्टला उत्तर देताना अमृतने सोनूचे त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात मदत केल्याबद्दल आभार मानले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा