लॉकडाउन सुरु झाल्यापासूनच सोनू सूद चांगलाच चर्चेत आहे. प्रथम त्यानी प्रवासी कामगार आणि विद्यार्थ्यांसह गरजू लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले. त्यानंतर तो त्यांच्यासाठी नोकरी आणि काम मिळावे यासाठी देखील प्रयत्नशील होता.
प्रत्येकजण सोनू सूदच्या उदारतेचे कौतुक करीत आहे. आपल्या मुलाखतीत सोनूने बर्याच वेळा नमूद केले आहे की आपल्या आईवडिलांमुळेच त्याला लोकांना मदत करायची प्रेरणा मिळते. त्याने नुकताच त्याच्या आईच्या पुण्यतिथीचा एक जुना फोटो शेअर केला आहे.
सोनूने त्याच्या आईचा ब्लैक एंड व्हाइट फोटो पोस्ट केला. ‘१३ वर्षांपूर्वी आज १३ ऑक्टोबर रोजी आयुष्य माझ्या हातातून निसटून गेले’, आई! असे भावनिक कॅप्शन दिले.
सोनू सूद कित्येक प्रसंगी आईची आठवण म्हणून फोटो शेअर करत राहतो. काही दिवसांपूर्वी त्यानी आपल्या आईच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने लिहिले आहे की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, मला कायम जीवनाचा मार्ग दाखवत राहा. माझी इच्छा आहे की मी तुम्हाला मिठी मारू शकेन आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे सांगू शकेन परंतु मला माहित आहे की तु जेथे असशील तेथे आमची आठवण येते. आयुष्य नेहमी एकसारखे नसते परंतु माझ्या आयुष्यात नेहमीच मला मार्ग दाखवणारी तूच आहेस.’
सोनू सूद येत्या काळात ‘पृथ्वीराज’ या आगामी चित्रपटात दिसेल. यशराज बॅनरखाली निर्मित या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत आहेत.