भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच्या पहिल्या दिवशी लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीची कामना करतात. लोक दिवाळीची तयारी खूप आधीपासून करतात आणि घरे दिव्यांनी उजळून टाकतात. आता दिवाळीचा थाट आणि झगमगते दिवे सर्वत्र दिसत आहेत. दिवाळी हा उत्साह आणि आनंदाचा सण आहे. लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात. आज सोशल मीडियाचे युग आहे, त्यामुळे दूरवर असलेले लोक व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादीद्वारे शुभेच्छा पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. दिवाळीच्या निमित्ताने लाखो लोकांचा ‘देवदूत’ बनलेला अभिनेता सोनू सूदने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सोनूने आपल्या चाहत्यांना एका वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळेच त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. सोनू ज्याप्रमाणे नेहमी गरजू लोकांना मदत करत असतो त्याचप्रमाणे त्याने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गरजूंना नोकरी मिळावी, त्यांच्या मुलांची शाळेची फी आणि घरचे रेशन यासंदर्भात त्याने पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोनूने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “गरजूंना नोकरी, मुलाची शाळेची फी, कोणाच्या घरचे रेशन किंवा गरजूच्या घरात तुम्ही लावलेला दिवा, तुमची दिवाळी अधिक उज्वल
करेल. दिवाळीच्या शुभेच्छा.” त्याच्या या पोस्टला चाहते प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत. चाहते देखील त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देत पोस्टला पसंती देत आहेत.
किसी जरूरतमंद को रोजगार,
किसी बच्चे की स्कूल की फीस,
किसी के घर का राशन,
यां फिर किसी जरूरतमंद के घर में आपके द्वारा जलाया गया दिया,
आप की दिवाली को और रोशन बना देगा ।
शुभ दिवाली ।— sonu sood (@SonuSood) November 4, 2021
सोनू कोरोना काळात खूप चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने अनेक गरीब लोकांना मदत केली होती. अनेक लोकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी देखील त्याने मदत केली होती. त्याबरोबर त्यांना अन्न-धान्याचा पुरवठाही त्याने केला होता. गरजू लोकांना मदत करणारा ‘देवदूत’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ‘किसान’ चित्रपट साइन केला आहे. याशिवाय तो ‘पृथ्वीराज’मध्येही दिसणार आहे. अलीकडेच सोनू सूदचा ‘साथ क्या निभाओगे’चा एक म्युझिक व्हिडिओही प्रदर्शित झाला होता. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘होय, सामना संपल्यानंतर भारत जिंकला आहे…’, अभिनेता सोनू सूदकडून विराट कोहलीचे कौतुक
-सोनू सूदच्या घरी आयकर विभागाने टाकली होती धाड; आता अधिकारी करतायेत त्याचेच कौतुक
-आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदने केले ट्वीट; म्हणाला, ‘आपल्याला नेहमीच…’










