बॉलिवूडमध्ये आता त्याच त्याच कहाण्या दाखवण्यापेक्षा काही वेगळी कहाणी, भूतकाळातील गोष्टी दाखवल्या जातात. बायोपिक तर आजकाल लोकांना खूप आवडतात. अनेक दिग्गज व्यक्तींवर बॉलिवूडमध्ये बायोपिक बनल्या आहेत. त्यात एखाद्या क्रिकेटरवर जर बायोपिक झाली मग प्रेक्षक तर खूपच खुश होतात. बॉलिवूडमध्ये महेंद्र सिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंवर बायोपिक बनलेल्या आहेत. कपिल देव यांच्यावरही ’83’ ही बायोपिकही बनली आहे. अशातच आता आता याच यादीत आणखी काही खेळाडूवर बायोपिक बनणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात कपिल देव, मिताली राज यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच सौरव गांगुली याच्यावर देखील बायोपिक बनणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीने देखील त्याच्या जीवनावर बनवल्या जाणाऱ्या बायोपिकसाठी होकार दर्शवला आहे. परंतु या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका कोण निभावणार आहे याची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.
परंतु व्हायरल होणाऱ्या माहितीनुसार, हा रोल रणबीर कपूर निभावू शकतो. मागे एका मुलाखतीत सौरव गांगुलीने सांगितले होते की, ऋतिक रोशन त्याचा आवडता अभिनेता आहे. त्यामुळे तो देखील सौरवची भूमिका साकार शकतो ही शक्यता नाकारता येणार नाही. (Sourav Ganguly biopic ranbir kapoor can play his role in movie)
सौरव गांगुलीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हो मी बायोपिकसाठी होकार दिला आहे. बायोपिक हिंदीमध्ये बनणार आहे. पण आता दिग्दर्शकाचे नाव सांगणे शक्य नाहीये. सगळ काही व्यवस्थित होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.”
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिण्याचे काम चालू आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या सौरव गांगुलीसोबत अनेक मीटिंग झाल्या आहेत. त्याची बायोपिक बनणार हे निश्चित आहे. पण आता त्याची भूमिका कोण निभावणार आहे. यावर चर्चा चालू आहे. रणबीर कपूरला बरीच पसंती आली आहे. तरीही आणखी दोन अभिनेत्यांच्या नावांची देखील चर्चा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??