सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकालाच आपल्याकडे भरपूर आर्थिक संपत्ती असावी, असे वाटत असते. त्यासाठी सर्वजण अपार कष्ट आणि मेहनत करतात, तर काहीजण बुद्धीच्या बळावर संपत्ती कमावतात. एखाद्या खेळातून तसेच आपल्या अंगी असलेल्या कलेतून यशाचे शिखर गाठत असताना देखील बरेचजण आर्थिक दृष्ट्या देखील चांगलेच सक्षम झालेले असतात. काही व्यक्ती आपल्या रोजच्या कमाईमधील काही टक्के रक्कम गरजूंना आणि गरिबांना वाटत असतात. अशात ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने, तर सर्वांना वेड लावले आहे. प्रत्येक व्यक्तीला या कार्यक्रमामध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी जाण्याची इच्छा असते. अशात शुक्रवारी (३ सप्टेंबर) ‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडू आले आणि त्यांनी हॉट सीटवर चांगलीच कमाल केली.
अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे दोघे हॉट सीटवर होते. या दोघांनी या कार्यक्रमामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सुरुवातीला या दोघांनी ६ प्रश्नांच्या उत्तरासाठी एकही लाईफलाईन वापरली नाही. परंतु २५ लाख रकमेजवळ पोहचेपर्यंत त्यांनी अनेक लाईफलाईन वापरल्या होत्या. यामध्ये विशेष म्हणजे त्यांच्या २५ लाखांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी स्वतः दिले. यासाठी त्यांनी कोणतीही लाईफलाईन वापरली नाही. शेवटी २५ लाख रुपये जिंकून ते आपल्या घरी परतले. (Sourav Ganguly Virendra Sehwag rupees 25 lakh on Kaun Banega crorepati 13 to use money for our foundation)
वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली २५ लाखांचे काय करणार?
आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी आर्थिक सुदृढ आहोत, त्यामुळे आपण गरजूंना आपल्यातील काही रक्कम दिली पाहिजे, असे खूपच कमी लोकांना वाटते. परंतु या समाजासाठी, आपल्या देशातील गरिबी नष्ट व्हावी यासाठी अनेक व्यक्ती दानधर्म करत असतात. अशात सेहवाग आणि गांगुली देखील त्यांनी जिंकलेले २५लाख रुपये चांगल्या कामासाठी वापरणार आहेत. या दोघांच्या देखील स्वतःच्या सामाजिक संस्था आहेत. वीरेंद्र सेहवाग फाऊंडेशन आणि सौरव गांगुली फाऊंडेशन या संस्थांमध्ये या पैशांचा उपयोग केला जाणार आहे.
वीरेंद्र आणि सौरव दोघांनाही धोनी बद्दल माहिती नव्हती ‘ही’ गोष्ट
हॉट सीटवर बसलेले असताना बिग बी आणि या दोघांमध्ये भरपूर गप्पा रंगल्या. प्रश्नांच्या बॅटिंग दरम्यान त्यांना धोनीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला, परंतु त्या दोघांनाही त्याचे उत्तर देता आले नाही. तो प्रश्न होता “महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकिर्दीत कोणत्या फलंदाजाला बाद केले?” याविषयी दोघांना देखील माहिती नव्हती. यासाठी त्या दोघांनी ५०-५० लाईफलाईनचा वापर केला. प्रश्नाचे उत्तर होते ट्रेविस डाऊनलिन. धोनीने २००९ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ट्रेविस डाऊनलिनला बाद केले होते. मात्र, तोपर्यंत सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर सेहवाग त्या सामन्यात खेळत नव्हता.
तसेच आरोग्याशी निगडित देखील त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. बिग बींनी विचारलेला प्रश्न होता, “टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने एक टूर्नामेंट का सोडून दिली होती? यावर दोघांनी देखील याचे बरोबर उत्तर देत मानसिक आजार हा पर्याय निवडला. तसेच सौरव गांगुली म्हणाला की, “सध्या खेळाडूंच्या मानसिकतेवर बराच परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय.”
याशिवाय, बिग बींनी वीरेंद्र सेहवागला खेळताना त्याच्या गाण्याच्या सवयीबद्दल देखील विचारले. बिग बी म्हणाले की,”कोणत्या परिस्थितीत तू कोणतं गाणं गातो?” यादरम्यान सेहवागने ग्रेग चॅपेलचा उल्लेख करून सौरव गांगुलीलाही चिडवले. कार्यक्रमावेळी त्यांनी आपल्या चेंजिंग रुममधील काही मजेदार किस्से देखील सांगितले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…