Sunday, February 1, 2026
Home साऊथ सिनेमा …म्हणून अल्लू अर्जुनवर होतोय कौतुकाचा वर्षाव; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल त्याची स्तुती

…म्हणून अल्लू अर्जुनवर होतोय कौतुकाचा वर्षाव; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल त्याची स्तुती

तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणी देखील प्रदर्शित करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत, चाहते अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्साहित आहेत. याच दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने केलेल्या कामाचे लोक कौतुक करत आहेत.

अल्लू अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो एका रस्त्यावर विक्रेत्याजवळ उभा आहे. तिथून निघताना तो तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काहीतरी देताना दिसत आहे. अल्लू अर्जुनच्या या व्हिडिओबद्दल सांगण्यात येत आहे की, तो नाश्ता करायला तिथे गेला होता आणि तिथून नाश्ता केल्यानंतर त्याने त्याचे गरीबांना काही पैसेही दिले, यामुळे सोशल मीडियावर युजर्स त्याचे खूप कौतुक करत आहेत. (Superstar Allu Arjun has been lauded for this work, the video has gone viral)

असे ही सांगितले जात आहे की, अल्लू अर्जुन त्याच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा’च्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. याच दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. त्याचा हा व्हिडिओ अगदी पहाटेचा आहे असे वाटते. सोशल मीडियावर युजर्स अल्लू अर्जुनच्या या उदात्त कार्याची जोरदार स्तुती करत आहेत. त्याच्या या व्हिडिओला खूप पसंती देखील मिळत आहे.

जर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीझ केला जाणार आहे. या ऍक्शन – थ्रिलर चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील डोंगरांमध्ये लाल चंदनाच्या चोरीवर आधारित आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनला पुष्पा राज या चंदन तस्करची भूमिका देण्यात आली आहे. याचे दिग्दर्शन सुकुमार करत आहे, ज्यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत ‘आर्या’ आणि ‘आर्य २’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न

हे देखील वाचा