Friday, July 5, 2024

विजय देवरकोंडाने सोशल मीडियावरील ट्रेंड केला फॉलो, अभिनेत्याचा रंगीबेरंगी कपड्यातील व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा हा अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेक घटनांची माहिती तो त्याच्या चाहत्यांना देत असतो. केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावर तो अनेकवेळा ट्रेंड फॉलो करत असतो. अशातच सोशल मीडियावर एका ट्रेंडिंगवर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विजयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरील ट्रेंडिंगवर म्युझिक आणि स्टेप्स आहेत. या व्हिडिओमध्ये तो वेगवेगळे कपडे बदलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या आधी देखील या ट्रेंडिंगवर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
(Sauth actor vijaydevar konda’s video viral on social media)

त्याच्या अनेक चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत.

मागील काही दिवसापूर्वी तो खूप चर्चेत आला होता. त्याने इंडियन आयडॉल १२ ची स्पर्धक शनमुखप्रिया हिला या शोच्या फिनालेमध्ये त्याच्या चित्रपटातील पुढील गाणे गाण्यासाठी घेणार आहे, असे सांगितले होते. तसेच तिच्या आईला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. तसेच काही दिवसांनी ती त्याच्या घरी तिच्या आईसोबत भेटायला गेली होती. त्याने त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून त्याचे वचन पूर्ण केले, असे सांगितले होते.

विजय देवरकोंडाने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

सुपरस्टार विजय देवरकोंडाचे चाहते त्याच्या बहुप्रतिक्षित ‘लायगर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी हा चित्रपट ९ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु असे म्हटले जात आहे की, कोरोनामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबले आहे आणि या कारणास्तव आता टीमला प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

हे देखील वाचा