Monday, July 1, 2024

तीन दशके बॉलिवूड गाजवणारा शाहरुखही बनला साऊथच्या ऍक्टरचा फॅन; म्हणाला, ‘तुझ्यासारखा अभिनेताच पाहिला नाही’

तीन दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करणारा सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमामुळे भलताच चर्चेत आहे. तो तब्बल ४ वर्षांनंतर रुपरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्याच्या आगामी सिनेमाचं नाव ‘जवान’ असे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक ऍटली करत आहेत. या सिनेमाबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती याचीही या सिनेमात एन्ट्री झाली आहे. असे म्हटले जात आहे की, ‘जवान’मध्ये विजय खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. अशातच आता सोशल मीडियावर शाहरुख खान आणि विजय सेतुपती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुख खान विजयची प्रशंसा करताना दिसत आहे.

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत शाहरुख खान (Shahrukh Khan) विजय सेतुपती (Vijay Sethupathi) याची प्रशंसा करत म्हणतो की, “तू शानदार अभिनेता आहेस. मी तुझ्यासारखा अभिनेता पाहिलाच नाही.” स्वत: शाहरुखच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकून विजयदेखील खुश आणि भावूक होतो. तो किती भावूक झाला, हे त्याच्या डोळ्यात दिसून येते. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच ट्विटरवर #ShahrukhKhan, #Jawan आणि #Vijaysethupathi हे हॅशटॅग्ज ट्रेंड होत आहेत.

विजय सेतुपती पहिल्यांदाच करतोय शाहरुखसोबत काम
विजय सेतुपती सध्या ‘पुष्पा: द रूल’ या सिनेमामुळेही चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे  की, अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पा २’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी विजय ‘विक्रम’, ‘मास्टर’, ‘९६’, ‘विक्रम वेधा’ यापासून ते ‘कारूपन’पर्यंत अनेक सिनेमात आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, ही पहिल्यांदाच वेळ आहे, जेव्हा तो शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे.

शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी सिनेमासाठी खूपच उत्सुक आहेत. ‘जवान’ हा सिनेमा पुढील वर्षी २ जून, २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

वेबसीरिज परवडत नाहीये, मग ईशाचा ‘हा’ व्हिडिओ एकदा पाहाच, तुमचंही भान जाईल हरपून

‘माझ्यात तेवढा दम नाही’, बॉलिवूडच्या तीन खानबद्दल करण जोहरचे खळबळजनक वक्तव्य

यूपी पोलिसांचे ट्वीट वेधतंय सर्वांचं लक्ष, ‘एक व्हिलन रिटर्न्स’चे पोस्टर शेअर करत म्हणालेत, ‘११२ डायल करा’

हे देखील वाचा