तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसणारी अभिनेत्री वेदिका कुमार नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंशूटमुळे चर्चेत असते. नुकतेच वेदिकाने तिच्या सर्व चित्रपटांद्वारे चित्रपट प्रेमींची मने जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कधी तिच्या बोल्ड लूकमुळे, तर कधी तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या तिची ताजी पोस्ट थोडी वेगळी आहे. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आताचा तिचा व्हिडीओ अजून हटके आहे, असे म्हणता येईल. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, वेदिकाने तिच्या आईसाठी केक बनवला आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या केक प्रेमाबद्दल देखील लिहिले आहे आणि एका लहान व्हिडिओमध्ये तिने केक कसा बनविला आहे, हे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये ती वेलवेट चॉकलेट केक घेऊन जाताना दिसत आहे, जो तिच्या आईने कापला आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘द बॉडी’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. तिचा शेवटचा चित्रपट ‘कंचना 3’ होता, ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. ‘विनोधन’ आणि ‘जंगल’ हे तिचे आगामी तमिळ चित्रपट आहेत. वेदिकाने २००६मध्ये मदरसी या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
सन २०१३ साली आलेल्या ‘परदेशी’ तमिळ चित्रपटाबद्दलही तिचे कौतुक झाले आहे. चित्रपटात वेदिका अंगम्माच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय वेदिकाचा शिवलिंग हा कन्नड मधला सर्वात मोठा चित्रपट ठरला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट