Monday, February 2, 2026
Home साऊथ सिनेमा Happy Birthday: कॉमेडी करून ब्रह्मनंदम यांनी कमावलंय नाव, एका चित्रपटासाठी घेतात तब्बल ‘इतकं’ मानधन

Happy Birthday: कॉमेडी करून ब्रह्मनंदम यांनी कमावलंय नाव, एका चित्रपटासाठी घेतात तब्बल ‘इतकं’ मानधन

दाक्षिणात्य चित्रपटक्षेत्रात एक अभिनेते असेही आहेत ज्यांच्या भूमिकेशिवाय नवीन चित्रपट येऊच शकत नाही. आपल्या असामान्य अभिनयाने त्यांनी इतकी प्रसिध्दी मिळवली आहे की प्रत्येक भारतीयाला त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतो. हे दिग्गज अभिनेते म्हणजेच दाक्षिणात्य सुपरस्टार ब्रह्मानंदम (Brahmanandam).

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या भूमिकेतून केली आणि आज जगभरात नाव कमावत आहेत. यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते जेष्ठ अभिनेते ब्रह्मानंदम यांचे. आपल्या दमदार अभिनयासाठी ते देशभर प्रसिद्ध आहेत. भलेही चिरंजीवी, प्रभुदेवा, अल्लू अर्जुन, महेश बाबू, प्रभास यांसारख्या अभिनेत्यांचा चाहता वर्ग मोठा असेल, पण त्यासोबतच साऊथ सिनेसृष्टीत एक असा चमकता ताराही आहे, ज्यांच्या अफलातून कॉमेडीनेच चित्रपट यशस्वी होतात. आपल्या कॉमेडीच्या कलेने ते इतके प्रसिद्ध आहेत की, अनेकदा न बोलताही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसायला लावतात. या लोकप्रिय अभिनेत्याचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

ब्रह्मानंदनम यांचा जन्म फेब्रुवारी १९६५ रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे झाला. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या घरात कोणीही डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले नव्हते. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी ते कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. १९८७मध्ये ‘अहा ना पेलांता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांना पहिल्याचं चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. इथूनच त्यांच्या अभिनयाला सुरुवात केली. आजच्या काळात त्यांच्या अभिनयाशिवाय कोणताच दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होत नाही. म्हणूनच आजपर्यंत त्यांनी तब्बल १००० चित्रपटात काम केले आहे.

ते अभिनयाबरोबरच चित्र काढण्याच्या कलेतही पारंगत आहेत. यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊनही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. आजही आपल्या घरी आलेल्या प्रत्येकाला ते हाताने जेवण बनवुन खायला घालतात. अभिनयामुळे त्यांना एका चित्रपटासाठी तब्बल एक कोटी इतके मानधन दिले जाते.

हेही वाचा :

हे देखील वाचा