कलाकार म्हटले की, त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट ही चर्चेत असते. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत तर अनेकांना माहिती असतेच. परंतु कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. खास करून त्यांच्या लव्ह लाईफमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना जरा जास्तच रस असतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी प्रेमविवाह केला. परंतु प्रेमविवाह केल्यानंतर देखील ते दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होते. असे अनेक बॉलिवूड कलाकार आहेत जे लग्नाच्या नात्यात असताना देखील दुसऱ्या व्यक्तीला डेट करत होते. टॉलिवूड देखील या बाबत काही मागे बरं का? दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे लग्न झाले असूनही त्यांचे बाहेर अफेअर चालू होते. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते साऊथमधील कलाकार ज्यांचे लग्न झाले असतानाही अफेअरच्या चर्चा ऐकू येत होत्या.
कमल हासन
चित्रपटसृष्टी आणि राजकारण दोन्ही क्षेत्रात आपले अढळ स्थान करणारे कमल हासन. कमल हासन यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढे यश प्राप्त केले आहे तेवढेच ते अनेकवेळा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चचा विषय ठरले आहेत. खास करून त्यांच्या लव्ह लाईफमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे. दोन वेळा लग्न करून देखील कमल यांचे ऍक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर चालू होते. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचे अफेअर चालू होते. परंतु आज ६३ व्या वर्षी देखील ते एकटे आहेत. कमल हासन यांचे पहिले लग्न वाणी गणपतीसोबत झाले होते. परंतु त्यावेळी ते सारिकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यामुळे कमल आणि वाणी यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी सारिकाशी लग्न केले. त्यांना श्रुती आणि अक्षरा नावाच्या दोन मुली आहेत. त्यानंतर काही कारणांनी कमल आणि सारिका यांचे नाते देखील तुटले.
नागार्जुन
याच यादीतील पुढचे नाव म्हणजे साऊथ इंडस्ट्रीचा मास म्हणजे अभिनेता नागार्जुन. तो देखील त्याच्या लव्ह लाईफमुळे भलताच चर्चेत राहिला होता. त्याने १९९२ मध्ये अमलासोबत लग्न केले. परंतु २००६ मध्ये त्याचे आणि बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचे रिलेशन आहे अशा बातम्या येऊ लागल्या. परंतु त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे त्याच्या पत्नीने देखील या सगळ्या प्रकाराकडे काहीसा कानाडोळा केला.
मीनाक्षी शेषाद्री
पुढील नाव येते ते म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. त्यांनी टॉलिवूड सोबतच बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. त्यांचे अनेक वर्ष गायक कुमार सानू यांच्यासोबत अफेअर चालू होते. खास गोष्ट म्हणते कुमार सानू हे त्यावेळी विवाहित होते. त्यांचे रिटा भट्टाचार्यसोबत लग्न झाले होते. तरी देखील ते मीनाक्षी शेषाद्रीसोबत रिलेशनमध्ये होते. खास गोष्ट म्हणजे रिटा यांना त्यांच्या या रिलेशनबाबत माहित होते, तरी देखील त्यांनी जास्त लक्ष दिले नाही. त्यांनी सांगितले होते की, कुमार सानू यांचे आणखी बऱ्याच अभिनेत्री सोबत अफेअर चालू होते. परंतु कितीही काहीही झालं तरी ते माझ्याकडेच येतात.
प्रभूदेवा
कोरिओग्राफर प्रभूदेवा आणि त्याची पत्नी रमलातने २०१० साली त्यांचे नाते संपवले आणि घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण होते की, प्रभुदेवा नेहमीच वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत दिसत होता आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील होत होत्या. प्रभुदेवाच्या घटस्फोटचे कारण होती ती साऊथ अभिनेत्री नयनतारा. ते दोघे अनेक दिवस रिलेशनमध्ये होते. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला समजल्यानंतर तिने घटस्फोट घेतला.
बोनी कपूर
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात साऊथ इंडस्ट्रीपासून केली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्या बोनी कपूर यांच्यासोबत रिलेशनमध्ये होते. त्यावेळी बोनी यांचे लग्न झाले होते. तसेच ते दोन मुलांचे वडील देखील होते. रिलेशनमध्ये असताना श्रीदेवी प्रेग्नंट राहिल्या. त्यामुळे बोनी यांनी त्यांच्या त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि त्यांनी श्रीदेवी सोबत लग्न केले.
हे आहेत साऊथमधील एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असणारे कलाकार.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट
नर्गिसची मुलाखत घेताना दत्त साहेबांच्या तोंडातून का फुटला नव्हता एकही शब्द? तुम्हालाही आवडेल किस्सा
स्वत:च्या सिनेमाच्या प्रीमिअरला जाण्यापूर्वी भीतीने थरथर कापत होता सनी देओल, काय होतं कारण?