Thursday, April 25, 2024

स्वत:च्या सिनेमाच्या प्रीमिअरला जाण्यापूर्वी भीतीने थरथर कापत होता सनी देओल, काय होतं कारण?

‘ये ढाई किलो का हात है’ म्हणत 50-100 लोकांना एकटाच मारणारा , तसेच पाकिस्तानात जाऊन पाण्याचा पंप उघडून आख्ख्या पाकिस्तानला हादरून सोडणारा सनी देओल तर सर्वांनाच पाहिलाय, पण हाच सनी देओल, जेव्हा आपल्याच एका सिनेमाच्या प्रीमिअरला जाण्यासाठी घाबरत होता, आणि जाणारच नाही म्हणून अडून बसला होता. हा सनी देओल कदाचित कुणाला माहितही नसेल. चला तर जाणून घेऊया…

तो सिनेमा होता 22 जून, 1990 रोजी रिलीझ झालेला ‘घायल’. या सिनेमाच्या निर्मितीचा किस्साही खूपच रंजक आहे. सिनेमाचे दिग्दर्शक होते राजकुमार संतोषी. 11 वीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडून दिलं होतं. वडिलांसोबत ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचे. कारण त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक ठेवण्यासाठी पैसेच नव्हते. पीएल.. संतोषी यांच्या निधनानंतर राजकुमार यांनी विधु विनोद चोप्रा आणि गोविंद निहलानी यांच्यासोबत काम केलं होतं. राजकुमार यांनी गोविंद निहलानी यांच्यासोबत 5सिनेमांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता त्यांनाही स्वत:चा सिनेमा बनवायचा होता. त्यांनी कमल हासन यांना लक्षात घेऊन एक स्क्रिप्ट लिहिली होती. सिनेमावर काम सुरू झालं. ज्या निर्मात्याला समजायचे की, राजकुमार गोविंद निहलानी यांच्यासोबत काम करायचे, ते ऐकून त्यांना वाटायचे की, हा आर्ट हाऊस टाईप सिनेमाच बनवेल.

त्यामुळे कोणीही त्यांच्या सिनेमावर पैसा लावायला तयार नव्हते. शेवटी निर्माते पी. सुब्बाराव या सिनेमावर पैसे लावण्यासाठी तयार झाले. पण त्यांनी अट घातली होती की, या सिनेमात हिरो संजय दत्त असेल. कारण संजय दत्त त्यावेळी सनी देओलपेक्षाही जास्त चर्चेत असलेलं नाव होतं. राजकुमारही अडून राहिले. म्हणाले, “जर कमल हासन यांना घ्यायचे नसेल, तर मी आपल्या सिनेमात सनी देओलला घेईल.” त्यावर सुब्बारावही म्हणाले, “ठीके, पण सनी देओलला त्याची फी कमी करावी लागेल. कारण, त्याचे मागील 7-8 सिनेमे फार काही कमाल दाखवू शकले नव्हते.”

सनी देओल सुब्बाराव यांना म्हणाला की, या सिनेमासाठी तो 18लाख रुपये घेईल, पण सुब्बाराव 12लाख रुपये देण्यासाठी तयार झाले. ते म्हणाले की, जर सिनेमाने चित्रपटगृहात सिल्व्हर ज्युबली केली. म्हणजेच 25आठवडे चालत राहिला, तर ते बाकीचे 6 लाख रुपयेदेखील देतील. डील डन झाली. पुढील2 महिन्यांपर्यंत सुब्बाराव गायब झाले. सनीने राजकुमार संतोषी यांची स्क्रिप्ट वाचली, त्यालाही त्या कहाणीवर विश्वास बसला. त्यामुळे तो राजकुमार आणि त्यांच्या स्क्रिप्टसोबत राजस्थान पोहोचला. तिथे सनी देओलचे वडील आणि दिग्गज अभिनेते धरम पाजी म्हणजेच धर्मेद्र जे.पी. दत्ता यांच्या ‘बँटवारा’ या सिनेमाची शूटिंग करत होते. राजकुमार यांनी त्यांना स्क्रिप्ट ऐकवली आणि धरम पाजीही खुश झाले. इतके खुश झाले की, ते स्वत:च या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी तयार झाले.

असंही म्हणलं जातं की, राजकुमार संतोषी यांच्या ‘घायल’ या सिनेमात मिथुन काम करणार होते, पण तेव्हा राजकुमार यांच्याकडं निर्माता नव्हता. जेव्हा धर्मेंद्र यांनी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली, तेव्हा ते इम्प्रेस झाले. राजकुमार म्हणाले की, हा सिनेमा मिथुन करत आहेत. त्यावेळी सनी देओलच्या करिअरचा आलेख आणखी खाली जाण्याच्या काठावर होता. त्याला एका हिट सिनेमाची गरज होती. त्यामुळे धर्मेंद्र यांनी पर्सनली मिथुन यांच्याशी राजकुमार संतोषी यांच्या सिनेमातून बाहेर पडण्यासाठी विनंती केली. धर्मेंद्र खूप मोठे स्टार होते. सोबतच ते इंडस्ट्रीत मिथुन यांचेही सीनिअर होते. मिथुन धर्मेंद्र यांच्या शब्दापुढे जाऊच शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘घायल’ सिनेमा सोडून दिला. शेवटी धर्मेंद्र यांनी ‘घायल’ सिनेमाची निर्मिती केली आणि सिनेमात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसला. त्याच्यासोबत सिनेमात मीनाक्षी शेषाद्री मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती.

‘घायल’ सिनेमा आपल्या काळातील जरा वेगळाच सिनेमा होता. म्हणजे काय तर90 च्या दशकात काही निर्मात्यांना सोडलं, तर प्रत्येकजण मसाला असणारे सिनेमेच बनवत होते. लव्हस्टोरी, कॉमेडी हे असे, पण ‘घायल’ सिनेमात सामाजिक विषय होता. धर्मेद्र यांच्या ओळखीचे अनेक लोक या सिनेमाची सुरुवातीची फुटेज पाहून वेगळंच मत मांडत होते. सिनेमा चालणार नाही आणि बरंच काही.. त्यासाठी सिनेमा बनण्यासाठी तब्बल अडीच वर्षे लागले. सिनेमा पूर्ण होण्यापूर्वी लोकांचे असे रिऍक्शन पाहून सनी देओलही घाबरला होता.

‘घायल’ सिनेमा बनून तयार झाला आणि रिलीझपूर्वी इंडस्ट्रीतील मित्रमंडळींसाठी एक प्रीमिअर ठेवण्यात आला. स्वत: सनीला आपल्याच सिनेमाच्या प्रीमिअरसाठी जायचे नव्हते. त्याला भीती वाटत होती की, जर हा सिनेमा लोकांना आवडला नाही, तर? तेव्हा सर्वांसाठी एक ऑकवर्ड सिच्वेशन होईल, आणि जरी सिनेमा आवडला, तर त्यांना एकेक करून खूप साऱ्या लोकांना भेटून आपल्याच सिनेमाची आणि कामाची प्रशंसा ऐकावी लागेल. म्हणजेच त्याच्यासाठी दोन्हीही गोष्टी अनकंफर्टेबल करणाऱ्या होत्या. पण कसं तरी करून सनी देओलला ‘घायल’ सिनेमाच्या प्रीमिअरला घेऊन जाण्यात आलं. तिथे इंडस्ट्रीतील लोकांनी त्याचा सिनेमा पाहिल्यानंतर उभे राहून टाळ्यांचा पाऊस पाडला. जेव्हा घायल सिनेमा रिलीझ झाला, तेव्हा चांगलाच हिट झाला. त्यावेळी सिनेमाच्या कास्ट आणि क्रू मेंबर्सने जंगी पार्टी केली.

हेही वाचा-
‘मजहब इंसानों के लिए बनता है…’, ओम पुरींचे ते डायलॉग, जे आजही चाहत्यांच्या मनावर करताहेत राज्य
‘हे’ आहेत मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशीचे बेस्ट चित्रपट; एकदा नक्की पाहा

हे देखील वाचा