तमिळ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक अभिनेते आहेत, ज्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते रांगच लावत असतात. रजनीकांत, कमल हासन, थालापती विजय, सूर्या आणि असे बरेच. यापैकीच एक म्हणजे चियान विक्रम होय. विक्रम याचा भलामोठा चाहतावर्ग आहे. तो आपल्या चाहत्यांच्या मनात खास स्थान बनवण्यात यशस्वी झाला आहे. अशात त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
अभिनेता चियान विक्रम (Chiyaan Vikram) याचे ‘कोब्रा’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन १’ या सिनेमांच्या प्रदर्शनापूर्वीच ट्विटरवर पदार्पण झाले आहे. म्हणजेच विक्रमने ट्विटरवर नवीन अकाऊंट सुरू केले आहे. ‘@chiyaan’ हे त्याचे अधिकृत ट्विटर हँडल आहे. त्याला ९२ हजारांहून अधिक फॉलोव्हर्सही मिळाले आहेत.
विक्रमने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणत आहे की, “मी चियान विक्रम आहे. खरोखर मीच आहे. गोंधळून जाऊ नका. मी कोणत्याही वेशात नाही. पी. रणजीतसोबतच्या माझ्या पुढच्या सिनेमासाठी हा माझा लूक आहे. मला सांगण्यात आले आहे की, ट्विटर मला माझ्या चाहत्यांशी जोडून ठेवेल आणि मी त्यांना माझ्या सिनेमांबद्दल माहिती देऊ शकेन. असे करण्यात मला जवळपास १५ वर्षे उशीर झाला असला तरी, पण माझ्या मते हीच योग्य वेळ आहे.”
— Chiyaan Vikram (@chiyaan) August 12, 2022
यासोबतच विक्रमने पुढे म्हटले की, तो ट्विटरवर त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी जोडला गेला आहे. तो म्हणाला, “मी लोकांना असे म्हणताना ऐकले आहे की, सोशल मीडियावर माझ्यासाठी खूप प्रेम आहे आणि आता मला थोडा आनंद घ्यायचा होता. मी आता ट्विटरवर आहे.” यापूर्वी विक्रमने इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधला होता. आता तो ट्विटरवर आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
विक्रम शेवटचा ‘महान’ या सिनेमात दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज यांनी केले होते. विक्रमचा ‘कोब्रा’ हा सिनेमा ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त त्याचा ‘पोन्नियिन सेल्वन १’ हा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल
भयंकर! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःलाच समजू लागला भूत, पेटवून घेत केली आत्महत्या
‘यामुळे’ कॅटरिना, दीपिकावर संतापला करण जोहर, असा घेणार बदला