Friday, April 19, 2024

‘यामुळे’ कॅटरिना, दीपिकावर संतापला करण जोहर, असा घेणार बदला

बॉलिवूड निर्माता करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. कार्यक्रमात येणारे अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या दैनंदिन आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना दिसतात. या शोचा 7वा सीझन सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच त्याचा नवीन भाग आला होता, ज्यामध्ये सोनम कपूर आणि अर्जुन कपूर सामील झाले. दरम्यान, शोचा होस्ट करण जोहर दीपिका पदुकोण आणि कॅटरिना कैफवर नाराज असल्याची बातमी आहे. या दोन्ही अभिनेत्रींवरील करणच्या रागाचे कारणही समोर आले आहे. दीपिका आणि कतरिनाचा बदला घेण्यासाठी करण लग्न करणार असल्याची चर्चा आहे. चला संपूर्ण प्रकरण सांगूया…

करण जोहर ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोचा ७वा सीझन होस्ट करत आहे. या शोमध्ये तो सर्व सेलिब्रिटींशी बोलतो. यादरम्यान सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे होत आहेत. दरम्यान, करण जोहरने आपण लग्न करण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला आहे. बदला घेण्यासाठी त्याला लग्न करायचे आहे, असेही त्याने सांगितले.

त्याच्या लग्नाच्या कोणत्याही समारंभात, ज्यांनी त्याला लग्नाचे आमंत्रण दिले नाही त्यांना तो आमंत्रित करणार नाही. त्याने कोणाचेही नाव घेतले नसले तरी करण दीपिका आणि कॅटरिनावर नाराज असल्याचे मानले जात आहे. दीपिका पदुकोणने 2018 मध्ये इटलीमध्ये तर कॅटरिना कैफने 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले होते. या दोन्ही लग्नात करण जोहरला आमंत्रित करण्यात आले नव्हते. लग्नाला फक्त जवळचे लोक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळेच त्यांचा बदला घेण्यासाठीच करण जोहर लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – ‘बबन’, ‘ख्वाडा’नंतर भाऊसाहेब शिंदेचा ‘रौंदळ’ घालणार महाराष्ट्रात राडा, हिंदीतही होणार धुमाकूळ
सुपरहिट ‘ताल’ चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण, ‘ताल २’ बद्दल केली महत्वाची घोषणा
थेट ट्यूशनवालीच्याच प्रेमात पडला खेसारीलाल यादव, गिरवले प्रेमाचे धडे

हे देखील वाचा