Wednesday, July 3, 2024

बोंबला! महेश बाबूचा भाऊ चौथ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत? किसींग व्हिडिओवर भडकली तिसरी पत्नी

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याचा सावत्र भाऊ आणि अभिनेता विजय कृष्ण नरेश म्हणजेच नरेश बाबू मागील काही दिवसांपासून भलताच चर्चेत आहे. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. तो त्याच्या राजकीय आणि सामाजिक कामांसाठीही चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. असे वृत्त आहे की, तो त्याची कथित गर्लफ्रेंड पवित्रा लोकेश हिच्यासोबत चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.

तीनदा लग्नाच्या बेडीत अडकलाय नरेश बाबू
नरेश बाबू (Naresh Babu) मागील काही काळापासून तेलुगू अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavithra Lokesh) हिच्यासोबत नात्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. खरं तर, अभिनेता तीनदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. आता त्याचा पवित्रासोबत एक किसींग व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर त्याची तिसरी पत्नी राम्या रघुपती हिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओ कसा झाला व्हायरल?
नरेश बाबू याने 31 डिसेंबर, 2022 रोजी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून कथित गर्लफ्रेंड पवित्रासोबतचा एका किसींग व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत दोघेही लिपलॉक करताना दिसत होते. हा व्हिडिओ शेअर करत नरेशने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्याच्या पत्नीने या व्हिडिओवर संताप व्यक्त केल्याचे दिसत आहे.

पत्नी म्हणाली, ‘चौथे लग्न करू देणार नाही’
माध्यमांतील वृत्तांनुसारस, नरेश बाबूच्या तिसऱ्या पत्नीने पतीला चौथे लग्न न करण्याची ताकीद दिली आहे. तिने माध्यमांना सांगितले आहे की, ‘काहीही होवो, ती नरेशला चौथ्यांदा लग्नबंधनात अडकू देणार नाही.’ याव्यतिरिक्त तिने म्हटले की, नरेशने तिला अजूनही घटस्फोट दिला नाहीये. अशात त्याला घटस्फोटाशिवाय चौथे लग्न करू देणार नाही. तिने पतीच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, “आधीच तीन लग्नातून त्याला प्रत्येक पत्नीकडून एक मुलगा आहे, तरीही तो असा कसा करू शकतो?”

वादाने भरलेले नरेशचे आयुष्य
नरेश बाबू आणि पवित्रा लोकेश यांच्या किसींग व्हिडिओबद्दल बोलायचं झालं, तर दोघांनीही त्यांच्या ‘मल्ली पेली’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनल सीनशी संबंधित हा व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, पवित्रादेखील तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. तिने 2007मध्ये सुचेंद्र प्रसाद याच्यासोबत लग्न केले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघेही 2018मध्ये वेगळे झाले होते. मात्र, त्यांनी अद्याप घटस्फोट घेतला नाहीये.

विशेष म्हणजे, जुलै 2022 नरेश बाबू याच्या पत्नीने पतीला कथिक गर्लफ्रेंडसोबत मसूरीच्या एका हॉटेलमध्ये पकडले होते. त्याचा व्हिडिओही जोरात व्हायरल झाला होता. राम्याने हॉटेलमध्ये पती आणि त्याच्या कथित गर्लफ्रेंडवर चपलांचा मारा केला होता. नरेश आता पुन्हा एकदा लिपलॉक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. (south superstar mahesh babu brother naresh kissing video with actress pavithra lokesh viral 3rd wife)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अपघातानंतर अवघ्या 12 तासातच रोहित शेट्टी परतला सेटवर, सिद्धार्थने कौतुक करत शेअर व्हिडिओ केला
पॅपराजी फोटो काढायला येताच रिक्षाचालकावर भडकली ट्विंकल खन्ना, व्हिडिओत कैद झाली रिऍक्शन

हे देखील वाचा