Saturday, July 27, 2024

‘तुम्ही मला खूप मौल्यवान गोष्टी शिकवल्या…;’म्हणत, महेश बाबूची मुलगी सिताराने शेअर केली भावनिक पोस्ट

दाक्षिणात्या सुरस्टारर महेश बाबू याचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे वयाच्या 79 वर्षी (दि, 15 नोव्हेंबर) रोजी निधन झाले आहे. कृष्णा हे तेलुगू इंडस्ट्रीतील प्रसदिध अभिनेता होते. त्यांना काही दिलसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्वरित हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या अचानक निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

अभिनेता महेश बाबू ( Mahesh Babu )सोबतच पूर्ण कुटुंब कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांच्या निधनानंतर दु:खाचा सामना करत आहेत. त्यामध्ये महेश बाबू याची मुलगी सितारा घट्टामनेनी (Sitara Ghattamaneni) हिने आपल्या आजोबाची आठवण काढत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या आजोबाचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “वीकेंडवर आता पहिल्यासारखं जेवन कधीच नाही मिळू शकणार. तुम्ही मला खूप चांगल्या मौल्यवान गोष्टी शिकवल्या…नेहमी मला हसवले…आता हे सगळं फक्त माझ्या आठवणीतच राहिले आहे. तुम्ही माझे हिरो आहात…मला आशा आहे की, मी नक्कीच तुमचा अभिमान बाळगू शकेल. मी तुम्हाला खूप मिस करेल.”

यापूर्वी महेश बाबू याच्या दोन्ही मुलांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये गौतम घट्टामनेनी (Gautam Ghattamaneni)  आणि सितारा घट्टामनेनी आपल्या आजोबाच्या फोटोवर फुल चढवताना दिसले. सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यासाठी कृष्णा यांच्या पार्थिव शरीराला पद्मालय स्टूडीओमध्ये ठेवले होते. यानंतर त्यांचा अंतिम संस्कार बुधवारी राजकीय सन्मानासोबत केला गेला.

gautam and sitara ghattamaneni

तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पहिले सिनेमास्कोप चित्रपट, पहिली काउबॉय शैली आणि तेलुगूमधील पहिला 70 एमएमचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कृष्णा यांना ओळखले जाते. त्यांनी पाच दशकापर्यत इंडस्ट्रीमध्ये काम केले .त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी चित्रपटामध्ये काम करणे सोडून दिले. कृष्णा यांच्या निधनावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अनेक मुख्यमंत्री आणि चित्रपटातील दिग्गज हस्तींनी देखिल शोक व्यक्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बच्चन कुटुंबातील ‘या’ जिवलग सदस्याच्या मृत्युनंतर हळहळले बिग बी, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
सुनील शेट्टी स्टारर ‘फाइल नंबर 323’ वादाच्या घेऱ्यात, मेहुल चोकसीने अनुराग कश्यपला पाठवले नोटीस

हे देखील वाचा