Sunday, December 3, 2023

भर गर्दीत चाहतीने प्रभासच्या गालावर मारली चापट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगन कठीन आहे. अनेकदा जूने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या प्रसिद्ध अभिनेता साउथ सुपरस्टार प्रभासचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रभाससोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या एका चाहतीने त्याला चापट मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आजचा नाही तर 2019 मधील 4 वर्षे जुना आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तो विमानतळावरील असल्याचे समजते. प्रभासला (Prabhas ) पाहून त्याची एक महिला चाहती उत्साहाने भरून येते आणि उड्या मारू लागते. यानंतर मुलगी प्रभासच्या शेजारी उभी राहते आणि त्याचा फोटो क्लिक करते. पण तिथून निघण्यापूर्वी ती उडी मारते आणि प्रभासच्या गालावर प्रेमाने थप्पड मारते आणि तिथून पळून जाते. हे पाहून केवळ प्रभासच नाही तर तिथे उपस्थित असलेले सगळेच हैराण झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रभासचे चाहते आणि इतर इंटरनेट यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की, “त्याबद्दल एवढी गडबड कशाला. तिने उत्साहात त्याच्या गालाला स्पर्श केला. त्याला चापट मारली नाही. सुपरस्टारचा कोणताही कट्टर चाहता असेच करेल.” तर दुसऱ्याने लिहिले की, “अबे पागल औरत.” हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

प्रभास वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास त्याचा ‘सालार’ चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे, जो आधी 28 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. पण पोस्ट प्रोडक्शनचे काम पूर्ण न झाल्यामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि मीनाक्षी चौधरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय प्रभास 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कल्की 2898 एडी’मध्येही दिसणार आहे. (South superstar Prabhas slapped on the cheek by a fan video viral on social media)

आधिक वाचा-
शाहरुखसोबत रोमान्स करणारी ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात; पाहा व्हिडिओ
धक्कादायक! मालिकेच्या सेटवर ‘ऐश्वर्या’ला बसला विजेचा झटका; हाॅस्पिटलमध्ये दाखल

हे देखील वाचा