Wednesday, October 9, 2024
Home साऊथ सिनेमा प्रभासला आणखी एक धक्का! फेसबुक अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने केले ‘हे’ काम

प्रभासला आणखी एक धक्का! फेसबुक अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने केले ‘हे’ काम

साऊथचा सुपरस्टार प्रभासने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. प्रभासची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभासने कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तो नुकताच ‘आदिपुरुष‘ या चित्रपटात दमदार कामगिरी करताना दिसला होता. प्रभास सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. प्रभास फक्त त्याच्या प्रोजेक्ट विषयी माहिती देण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करत असतो. यादरम्यान प्रभासचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे.

फेसबुक पेज हॅक केल्यानंतर हॅकर्सनी ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हायरल व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यानंतर प्रभासने (Prabhas) त्याच्या चाहत्यांना सांगिकले की, “माझे फेसबुत अकाऊंट हॅक झाले आहे. त्या पेजवर काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. टीम ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे.” फेसबुक पेजवर प्रभासला 24 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात.

Prabhas

हॅकरच्या या पोस्टनंतर ट्रोलर्सनीही खूप कमेंट करायला सुरुवात केली. ‘आदिपुरुष’ ते ‘राधे श्याम’सारखे मोठे चित्रपट या अभिनेत्याचे फ्लॉप झाले होते. ‘आदिपुरुष’मुळे प्रभास आणि त्याची टीम याआधीही खूप वादात सापडली होती. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहते प्रभास विषया चर्चा करताना दिसत आहेत.

प्रभासच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ‘आदिपुरुष’च्या अपयशानंतर प्रभास आता अॅक्शन-थ्रिलर चित्रपट सालार पार्ट 1: सीझफायरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले. तसेच प्रभास ‘सालार’ ‘केजीएफ युनिव्हर्स’चा एक भाग असल्याची देखील चर्चा आहे. त्या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तो चित्रपट 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. (South Superstar Prabhas Facebook Page Hacked)

अधिक वाचा- 
मनोरंजनविश्वात अनेक कलाकारांचे झाले हृदयविकाराच्या झटक्याने निधन, जाणून घ्या त्यांची नावे
शाळेच्या खास आठवणींना हटके पद्धतीने जपत, ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री रोज मारते शाळेत फेरफटका

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा