Monday, April 21, 2025
Home साऊथ सिनेमा ‘जयभीम’ चित्रपट कायदेशीर कचाट्यात, चित्रपटातील अभिनेत्यानेच केला कथा चोरीचा आरोप

‘जयभीम’ चित्रपट कायदेशीर कचाट्यात, चित्रपटातील अभिनेत्यानेच केला कथा चोरीचा आरोप

साऊथचा सुपरस्टार सुर्याचा ‘जय भीम’ चित्रपट कायदेशीर वादात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादात सापडला आहे. आता चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटावर कॉपीराइट कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित सुर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट पीरियड ड्रामा आहे आणि त्यात तामिळनाडूमधील उपेक्षित समुदायांवरील पोलिसांच्या क्रूरतेचे चित्रण आहे. काय आहे चित्रपटाचा हा नेमका वाद, चला जाणून घेऊ. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्ही कुलंजीप्पन नावाच्या व्यक्तीने, ज्याची चित्रपटात एक व्यक्तिरेखा देखील आहे, त्याने चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या कथेचा वापर केला आहे, परंतु त्यांना वचन दिल्याप्रमाणे कोणतीही रॉयल्टी दिली नाही, असा आरोप कुलंजयप्पन यांनी केला आहे. कुलंजयप्पन यांनी वचन दिलेली भरपाई न देता चित्रपटासाठी त्यांच्या जीवनकथेचा वापर केल्याबद्दल कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रिपोर्टनुसार, 2019 मध्ये, दिग्दर्शकाने शूटिंगपूर्वी कुलंजियप्पन यांची भेट घेतली होती. यावेळी ग्यानवेलने त्यांच्या जीवनकथेसाठी 50 लाख रुपये रॉयल्टी देण्याचे आश्वासन दिले होते, असेही सांगितले जात आहे. याशिवाय त्यांना चित्रपटाच्या नफ्यातही वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. कुलंजयप्पन यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आश्वासनाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. या चित्रपटात आपल्या समाजाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे, असेही कुलंजियप्पन म्हणाले.

दरम्यान सुपरस्टार सुर्याचा चित्रपट ‘जय भीम’ 2 नोव्हेंबर 2021 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. जय भीम या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर सूर्याने या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी बरीच प्रशंसाही मिळवली. चित्रपटातील कथेचे आणि अभिनयाचे सर्वत्र जोरदार कौतुक झाले होते.

हेही वाचा –
बाबो! मीडियासमोरच रवी किशनने केला अभिनेत्रीला किस, वाचा रंजक किस्सा
केकेच्या लेकीने वडिलांना वाहिली अनोखी श्रद्धांजली, स्टेजवर गाणे गात जागवल्या आठवणी
थिएटरमध्ये झाली अनुपम खेर आणि किरण खेरची मैत्री, पुढे आयुष्यभरासाठी बांधली रेशीमगाठ

हे देखील वाचा